पाचोरा – दि. 24 डिसेंबर 2024 रोजी, मंगळवार, आप्पासाहेब पी.एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रा (ता. पाचोरा) येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या
नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे सहभाग नोंदवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली.
वर्ग 6 वी:-जलशुद्धीकरण प्रकल्प:
पूर्वा पाटील, स्वरांगी सराफ, आणि निरुशा कुमावत यांनी सादर केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यासाठी योग्य बनवण्याच्या विविध पद्धतींवर आधारित होता. त्यांनी सादर केलेल्या मॉडेलने शाश्वत जलव्यवस्थापनावर प्रकाश टाकला.
सोलर हाऊस प्रकल्प:-स्वानंद सराफ, जयेश पाटील, दुर्गेश पाटील, आणि आदित्य पाटील यांनी सोलर हाऊसची संकल्पना प्रभावीपणे
सादर केली. या प्रकल्पात सौरऊर्जेचा उपयोग करून उर्जेची बचत कशी करता येते, यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
वर्ग 7 वी: -सूक्ष्मदर्शकाचा शोधरेवती देशमुख, लीशा जैन, प्रियांशी सोनवणे, सांची तोतला, आणि अर्पिता वावगे यांनी सूक्ष्मदर्शक कसे कार्य करते याची सखोल माहिती दिली. त्यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक उदाहरणे दिली.
नैसर्गिक शेती:-लावण्या रावडे, मीहीका जैन, आणि प्रांजल सुरवाडे यांनी सादर केलेला नैसर्गिक शेती प्रकल्प सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येते याचे मार्गदर्शन करणारा होता. त्यांनी पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.
वर्ग 8 वी:-दिशा पाटील आणि जिनिषा संघवी यांनी “जलनिर्मिती” या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याच्या निर्मितीतील विज्ञान व त्यातील शक्यता उलगडून दाखवल्या.
वर्ग 9 वी: -यश सुवालका आणि दर्शील प्रजापत यांनी सादर केलेला “मिनी ट्रॅक्टर” प्रकल्प ग्रामीण शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक यंत्रणेवर आधारित होता.
या प्रदर्शनाला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भेट दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या कल्पनाशक्ती व कर्तृत्वाला दाद दिली.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीशजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, शाळा समितीचे चेअरमन लालचंदजी केसवानी, आणि सचिव रितेशजी ललवाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनात स्मिता देशमुख मॅडम, संगीता पाटकरी मॅडम, आनंद दायमा सर, व इतर शिक्षकांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना यश मिळाले.
विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देऊन त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा दिली. शिक्षण, विज्ञान, व सर्जनशीलतेच्या एका आदर्श संगमाचा अनुभव देणारे हे प्रदर्शन भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
विज्ञान प्रदर्शनाच्या या आनंदोत्सवाने शाळेच्या शैक्षणिक वारश्याला नवी उंची दिली असून, विद्यार्थ्यांच्या यशाने तालुक्याचा गौरव वाढवला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.