पाचोरा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत स्थानिक इतिहास पुनर्लेखनावर राज्यस्तरीय परिषद

0

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA), शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या वतीने राज्यस्तरीय एक दिवशीय इतिहास परिषद आयोजित करण्यात येत आहे.
ही परिषद शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयोजनाखाली होणार आहे. परिषदेसाठी “स्थानिक इतिहास पुनर्लेखन आणि संशोधन” हा विषय निवडण्यात आला असून, स्थानिक इतिहासाच्या संवर्धनासाठी संशोधन आणि अभ्यासाच्या नव्या वाटा शोधण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरेल.
श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, ज्याला नॅकच्या तिसऱ्या चक्रात सी ग्रेड (CGPA 1.91) प्राप्त झाली आहे, हा कार्यक्रम आयोजित करत आहे. इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ हे या परिषदेचे समन्वयक असून, प्रा. डॉ. माणिक पी. पाटील हे सहसमन्वयक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
या परिषदेचे उद्दिष्ट स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंचे सखोल पुनर्लेखन व त्यावरील संशोधनास चालना देणे आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना स्थानिक पातळीवर इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक स्रोत व पद्धती यावर मार्गदर्शन करणे, तसेच विविध विद्वानांनी त्यांच्या संशोधनातून स्थानिक इतिहासाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवून देणे, हे या परिषदेचे मुख्य हेतू आहेत.
परिषदेत सहभागी होणाऱ्या इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक यांना स्थानिक इतिहासाच्या अद्ययावत माहितीसह नवीन संशोधन विषयांवर चर्चा करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान विविध तज्ञ व्याख्यानांद्वारे आपले विचार मांडतील, तसेच इतिहास पुनर्लेखनाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधतील.
परिषदेला राज्यातील मान्यवर इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या अनभिज्ञ राहिलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सर्व संबंधित अभ्यासकांनी आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिक इतिहास पुनर्लेखन परिषदेस मान्यवरांचा गौरवशाली सहभाग
      परिषदेचा उद्घाटन समारंभ आणि प्रमुख मान्यवर
परिषदेचा उद्घाटन समारंभ ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत पार पडणार असून, प्रमुख उद्घाटक व वीजभाषक म्हणून डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य व अध्यक्ष, अखिल भारतीय सर्वोदय संघ, लातूर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, मानद सचिव अॅड. महेश एस. देशमुख, तसेच संचालक मंडळातील आनंदराव दगाजी विठ्ठल वाघ, दादासाहेब भागचंद मोतिलाल राका, भाईसाहेब दुष्यंत प्रविणसागर रावल, डॉ. पितांबर नध्धू पाटील, नानासाहेब सुरेश देवरे, डॉ. जयंतराव बी. पाटील, संजय हिरालाल कुमावत, योगेश माधवराव पाटील, सतीष नारायण चौंधरी, खलील दादामिया देशमुख, आणि प्रा. एस. झेड. तोतला यांचा समावेश आहे.
द्वितीय सत्र: सकाळी १०.३० ते १२.००
द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. जी. बी. शहा, अध्यक्ष, जैन इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य, आणि प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले, के.एन.एम.पी.पी. कला महाविद्यालय, मारवड, हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रात इतिहास संशोधनाच्या विविध पद्धती, स्थानिक इतिहासाचे महत्त्व, आणि स्थानिक वारसाच्या जतनाच्या उपक्रमांवर चर्चा होईल.
शोधनिबंध वाचन:
सकाळच्या सत्रानंतर दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत सहभागी संशोधक व अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करतील. या सत्रात इतिहासाच्या विविध पैलूंवर आधारलेले अभ्यासपूर्ण विचार मांडले जातील. त्यानंतर दुपारी १.०० ते २.०० दरम्यान भोजनाची व्यवस्था आहे.
तृतीय सत्र: दुपारी २.०० ते ३.३०
तृतीय सत्रात डॉ. प्रशांत सुधाकरराव देशमुख, चेअरमन, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव, आणि प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, माजी अधिष्ठाता, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील. या सत्रात इतिहास पुनर्लेखनासाठी आवश्यक साधने, ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन आणि संशोधन प्रक्रियेतील आव्हाने यावर चर्चा होईल.
चौथे सत्र व समारोप:
दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत समारोप सत्र पार पडेल. यामध्ये प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, सदस्य, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील, तर अध्यक्षपदाची जबाबदारी नानासाहेब व्ही. टी. जोशी, व्हा. चेअरमन, पा.ता.स.शि. संस्था, पाचोरा सांभाळतील. या सत्रात प्रा. एस. झेड. तोतला यांचीही प्रमुख उपस्थिती राहील.
परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन:
या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला जाईल. परिषदेच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ (समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख) आणि प्रा. डॉ. माणिक पी. पाटील (सहसमन्वयक) यांनी केले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून इतिहास संशोधनाला नव्याने चालना मिळेल आणि स्थानिक इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here