सामनेर (ता. पाचोरा, जि. जळगाव):
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 1998-99 च्या 10वी बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे संपन्न झाला. तब्बल 25 वर्षांनंतर शाळेतील जुने वर्गमित्र पुन्हा एकत्र आले आणि शालेय आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन महेंद्रकुमार साळुंखे, प्रमोद पाटील आणि स्वप्निल शिरोळे यांनी केले. या प्रसंगी स्वागतासाठी संपूर्ण परिसर आकर्षक रांगोळ्या आणि बॅनर्सने सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली, ज्यामध्ये भारती सोनकुळ, सुरेखा पाटील, भारती पाटील, वैशाली पाटील, जागृती डांबरे, पितांबर पाटील, गोपाल पाटील, गजानन पाटील, पिंटू पाटील यांचा सहभाग होता.
दहावी बॅचचे माजी विद्यार्थी भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भूषण पाटील, दीपक कैलास पाटील, दीपक फुलचंद पाटील, राहुल सोनकूळ यांना सैन्य दलातून सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. सत्कारप्रसंगी संदीप पाटील, सचिन चिंचोले, गोपीचंद पाटील, दिलीप पाटील, प्रमोद साळुंखे, वासुदेव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर, शिक्षक, व्यवस्थापक, अभियंते, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आदर्श शेतकरी, व्यावसायिक अशा विविध पदांवर कार्यरत असलेले राजेंद्र बाविस्कर, योगेश जाधव, वासुदेव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रवीण पाटील, गोपीचंद पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, स्वाती पाटील, मीना पाटील, जागृती पाटील, मनीषा पाटील, सुलोचना पाटील, भारती पाटील, सुनंदा पाटील, मीनाक्षी पाटील, सुनीता पाटील, कल्पना पाटील, भावना चव्हाण यांचा समावेश होता.
या मेळाव्यात शाळेतील आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी शालेय जीवनातील हास्यविनोद आणि आठवणींचे किस्से सांगत वातावरण आनंदमय केले. स्नेहमेळाव्याच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्रकुमार साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.