रावेर ( प्रतीनिधी ) श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, वाघोदे बु।। (ता. रावेर, जि. जळगाव) यांच्या वतीने “हीरक महोत्सवी वर्ष” निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुर्जर भाषिक अल्पसंख्यांक संस्थाचालक संघटना, जळगाव आणि गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचा प्रमुख उद्देश गुर्जर बोलीभाषा आणि साहित्याचे संवर्धन व प्रचार-प्रसार करणे हा आहे. या विशेष निमित्ताने “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या दुसऱ्या पुस्तकाचे
विमोचन आणि “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन” आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर, जि. जळगाव असून, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमात “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या पुस्तकाचे विमोचन मा. श्री. गोकुल श्रावण महाजन, कार्यकारी अभियंता, तापी
पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन” चे उद्घाटन मा. श्री. डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, कवी कालिदास बहुजन चळवळ विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद त्र्यंबक महाजन, अध्यक्ष, श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, वाघोदे बु।। असतील.
प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. वसंतराव लक्ष्मण महाजन, कृषी तज्ज्ञ, चिनावल आणि मा. श्री. डॉ. विलास जगन्नाथ पाटील, बालरोगतज्ज्ञ, बेदसाई हॉस्पिटल, सावदा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. श्रावण सिताराम महाजन, श्री. डी. के. महाजन, श्री. किशोर जगन्नाथ पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हे भोजन दुपारी १२:३० ते २:०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. गुर्जर समाजाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि समाजातील एकतेचा अनुभव घेण्यासाठी सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर, जि. जळगाव येथे असून, अधिक माहितीसाठी श्री. विजयकुमार बाजीराव पाटील (व्हॉ. चेअरमन) किंवा श्री. पी. एल. महाजन (सहसचिव) यांच्याशी संपर्क साधावा. “गुर्जर बोली संवर्धनासाठी एक पाऊल पुढे” हा संदेश देत हा कार्यक्रम निश्चितच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.