मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी; गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

0

जळगाव, दिनांक 31 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : जळगाव येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. रोहन पाटील यांनी ०४ चार किलो गर्भपिशवी गाठीची अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची

शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडली.
तसेच आज ३० डिसेंबर रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. मिलींद चौधरी जळगाव यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (LAVH) दोन महिला रुग्णांवर यशस्वीपणे पार पाडली.या दोन्हीं वेगवेगळ्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला यांनी

रुग्णांना योग्य भूल देऊन अति जोखमीची अशी शस्त्रक्रिया पार पाडली व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. नम्रता आच्छा, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली बावस्कर तसेच सहाय्यक अधिसेविका श्रीमती. संगीता शिंगारे, परिसेविका श्रीमती. रूपाली जोशी व अधिपरिचारीका श्रीमती. वैशाली भालेराव, श्रीमती. दिपाली बढे, ऋतुजा काळे, श्रीमती. नम्रता नागपुरकर, श्रीमती. तुळसा माळी व कक्षसेवक श्री. विशाल परदेशी, एजाज तडवी यांनी तसेच शस्त्रक्रिय विभागातील इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्य लाभले. जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी) जळगाव येथे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here