जारगाव – तालुका जारगाव येथे एक विट श्रमाची, एक विट आई-वडिलांच्या आशीर्वादाची, एक विट लेकीच्या प्रेमाची आणि एक विट आपुलकीच्या सहकार्याची उभारणी असे विलोभनीय चित्र लोखंडे परिवाराने साकारले
आहे. याच भावनेतून ‘रेणुका निवास’ या नवीन वास्तूचा गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ 1 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
लोखंडे परिवाराचे पितृछत्र असलेल्या स्व. बापुराव लोखंडे यांच्या कार्यप्रेरणेने आणि मातोश्री मंगलबाई लोखंडे यांच्या आशीर्वादाने ‘रेणुका निवास’ हे घर उभारले गेले. या वास्तूत
परिवाराचे सुख-समाधान नांदो, हीच कुटुंबीयांची भावना.
नाथ नगर, जारगाव (ता. पाचोरा) येथील गॅस गोडाऊनच्या पाठीमागे नव्याने उभारलेल्या वास्तूतील गृहप्रवेश व वास्तुशांती विधी समाधान गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. समारंभात परिवारातील सदस्यांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जारगाव येथील सरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख सुनिलआबा पाटील आणि ध्येय परिवाराचे संदीप महाजनसर या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लोखंडे परिवाराला शुभेच्छा देत त्यांच्या नव्या वास्तूतील सुख-समृद्धीची कामना केली.
‘रेणुका निवास’ उभारण्यात लोखंडे परिवारातील सुकदेव तान्हाजी लोखंडे, सौ. भागाबाई सुकदेव लोखंडे, भुषण बापुराव लोखंडे, सौ. स्वाती भुषण लोखंडे, शुभम बापुराव लोखंडे, सौ. पूजा शुभम लोखंडे, गोपाल बापुराव लोखंडे, सौ. स्नेहल गोपाल लोखंडे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही वास्तू उभारणी शक्य झाली.समारंभात जारगाव येथील समाधान गुरुजी यांच्या अमृत वार्णीतून संपन्न झालेल्या विविध धार्मिक विधींनंतर परिवारातील सदस्य व उपस्थित पाहुण्यांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या प्रसंगी नव्या वास्तूत सुख, शांती आणि भरभराट होण्याच्या शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.लोखंडे परिवाराने परिश्रम, सहकार्य आणि कौटुंबिक एकतेच्या बळावर उभारलेल्या ‘रेणुका निवास’चे वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभाचे हे पर्व प्रेरणादायी आहे. या नव्या वास्तूतील प्रत्येक दिवस सुखसमृद्धी आणि आनंदाचा ठरो, अशीच सर्वांची प्रार्थना आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.