पाचोरा – श्री क्षेत्र गजानन महाराज तपोभूमी, कावनई, नाशिक येथून निघालेल्या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याचे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी पाचोरा येथे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या पवित्र सोहळ्याचे आयोजन गजानन उद्योग समूहाचे राजाराम सोनार , सौ लताताई सोनार , प्रमोद सोनार , सौ योगीता सोनार , डॉ दिनेश सोनार , डॉ सौ जयश्री सोनार , दत्ता सोनार सौ राधिका सोनार , श्रीमती पोर्णीमा योगेश सोनार , कमलेश सोनार , सौ आरती सोनार परिवाराने केले होते. श्री स्वामी लॉन्स, पाचोरा येथे दिंडीतील वारकऱ्यांचा मुक्काम

आयोजित करण्यात आला होता.
आगमनावेळी पाचोऱ्यातील गजानन उद्योग समुहा सोबत भाविकांनी फुलांनी सजवलेले रस्ते, भजन-कीर्तन आणि जयघोषांनी त्यांचे स्वागत केले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गजानन महाराजांची पालखी येताच उपस्थित भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली.
सायंकाळी ८:३० वाजता महाराजांच्या पवित्र मूर्तीची भव्य आरती सोनार परिवाराच्या हस्ते संपन्न झाली. या आरतीला शेकडो भाविकांनी हजेरी लावून आपली श्रद्धा व्यक्त

केली. आरतीनंतर आयोजित महाप्रसादाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाप्रसादामुळे सर्व भक्तांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गजानन उद्योग समूह परिवाराने या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. वारकऱ्यांसाठी निवास, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आणि महाप्रसादाच्या व्यवस्थेसह सर्व गरजा पुरवल्या गेल्या. या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी आणि भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पाचोरा व परिसरातील शेकडो भाविकांनी या पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आरती व महाप्रसादाचा आनंद लुटला. दिंडीच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी भक्ती आणि सेवा यांची एकजूट दाखवली.
गजानन महाराज पायी दिंडी सोहळा भक्तांसाठी श्रद्धा, एकात्मता आणि सेवाभावाचे प्रतीक ठरतो. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांनी संयम आणि भक्ती यांचा अनुभव घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे गजानन उद्योग समूह परिवाराने समाधान व्यक्त केले.
पाचोऱ्यातील मुक्कामानंतर दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून, शेवटचा टप्पा श्री क्षेत्र शेगाव येथे होणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.