राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत नगर विकास विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये पाचोरा नगरपरिषदेचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवत यश

0

पाचोरा: राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत नगर विकास विभागातर्फे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2025 मध्ये पाचोरा नगरपरिषदेने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवत शानदार कामगिरी केली आहे. जळगाव

येथे दिनांक 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत झालेल्या या स्पर्धांचे आयोजन नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.
                या स्पर्धांचे उद्दिष्ट नगरपरिषद

कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण कमी करणे, त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, तसेच क्रीडांमुळे टीमवर्क व सांघिक भावना वाढीस लागणे हे होते. याशिवाय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून करण्यात आला.
     या महोत्सवात पाचोरा नगरपरिषदेने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये

सहभाग घेत आघाडीची कामगिरी बजावली. व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचोरा संघाने विजेतेपद पटकावले, तर क्रिकेट स्पर्धेत संघ उपविजेता ठरला. वैयक्तिक कामगिरीमध्ये 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत विद्युत अभियंता योगेश रेवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले.
   समूह गायन स्पर्धेत दीपक शेजवळ व दीपक खैरे यांनी उपविजेतेपद मिळवले, तर गोळाफेक या प्रकारात चंद्रकांत माळी

यांनी उपविजेतेपद पटकावले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुख्याधिकारी मंगेश देवरे, संगणक अभियंता मंगेश माने व लिपिक ललित सोनार यांनी वैयक्तिक गीते सादर करत आपल्या कला कौशल्याचा ठसा उमटवला. स्वलिखित कवितावाचनात संदीप जगताप यांनी सहभाग नोंदवून आपल्या काव्यप्रतिभेचे दर्शन घडवले.
    पाचोरा नगरपरिषदेच्या संघटित

कामगिरीमागे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन ठरले. त्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व यापुढेही अधिकाधिक यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    राज्याच्या क्रीडा धोरणामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून

त्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वागत केले आहे. महोत्सवातील सहभागामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व मानसिक ताण कमी होण्यास मदत झाली असून सांघिक कार्यक्षमतेलाही चालना मिळाली आहे.
     स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पुढील वर्षीही अशा स्पर्धांचे आयोजन व्यापक

प्रमाणावर करावे, अशी मागणी केली आहे. या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नव्या ऊर्जा आणि उत्साहाची लहर निर्माण झाली आहे.
     या महोत्सवात विविध नगरपरिषदांनी सहभाग नोंदवला असला तरी पाचोरा नगरपरिषदेने आपल्या कामगिरीतून वेगळेपणा सिद्ध केला. खेळांमधून केवळ आरोग्य सुधारणेच नव्हे, तर कर्मचारी एकमेकांशी सुसंवाद साधण्यातही

यशस्वी ठरले आहेत.
  राज्य सरकारच्या क्रीडा धोरणाअंतर्गत आयोजित या महोत्सवामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील सुप्त कला उजेडात आल्या आहेत. पाचोरा नगरपरिषदेसारख्या संघटनांनी केलेली कामगिरी इतर नगरपरिषदांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here