पाचोरा: महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेत गो. से. हायस्कूलने ‘कास्टलेस इंडिया’ या प्रभावी नाट्य सादरीकरणाद्वारे समाजातील जातीयतेवर प्रहार करत राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ केली. महेश कौंडिण्य लिखित व दिग्दर्शित या बालनाट्यात
विविध प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी उपयोगातून जातीयतेच्या विघटनकारक परिणामांना प्रकाश टाकत समाज एकसंघतेचा संदेश देण्यात आला.
तालुक्यातून पहिल्यांदाच राज्य स्तरावर सादर होण्याचा मान मिळवणाऱ्या या शाळेच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. महापुरुषांच्या योगदानाला एका समाजापुरते मर्यादित ठेवण्याऐवजी त्यांच्या कार्याची व्यापकता
दाखविण्याचा प्रयत्न या नाट्यातून करण्यात आला. मनोरंजनातून उद्बोधन देण्याच्या हेतूने सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाने बालकलावंतांच्या अभिनयातून समाजाला जातीयतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीयत्वाची महत्त्वपूर्ण शिकवण दिली.
कलाकार व तांत्रिक बाजूचे योगदान
या नाट्यात ललित आंबेकर, गीत महाजन, आयुष निकम, सार्थक चिंचोले, धवल सूर्यवंशी, आर्यन तडवी, कार्तिकी पाटील, दिव्यराज खैरनार, स्तवन भट, नेहा महालपुरे, देवश्री कासार, चेतन सोनवणे, भुवन्य सूर्यवंशी, यज्ञेश चौधरी, देवांश महाजन, सृष्टी वाघ, सृष्टी शिंपी, सायली सोनार, नेहा महालपुरे या
बालकलावंतांनी अभिनय केला.
तांत्रिक बाजूस सुबोध कांतायन यांनी रंगभूषा, रविंद्र जाधव यांनी प्रकाश योजना, सोनाली सूर्यवंशी यांनी वेशभूषा, तर स्मिता सोनवणे यांनी पार्श्वसंगीत यशस्वीपणे सांभाळले.
शालेय संस्थांचे अभिनंदन व प्रोत्साहन
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेशदादा देशमुख, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवआण्णा महाजन, मुख्याध्यापक एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. अंजली गोहिल, पर्यवेक्षक ए.बी. अहिरे, आर.बी. तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व तांत्रिक सहकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.
‘कास्टलेस इंडिया’ या नाट्यातून जातीयतेचे समाजावर होणारे नकारात्मक परिणाम आणि त्याचा
विद्यार्थी मनावर पडणारा प्रभाव यावर भाष्य करण्यात आले. या प्रयोगाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार व राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याचे काम केले आहे.
गो. से. हायस्कूलच्या या नाट्यप्रयोगाने राज्यस्तरीय स्पर्धेत ठसा उमटवून पाचोरा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा प्रयोगांमधून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी आणि समाजात एकात्मतेचा विचार प्रबळ व्हावा, हीच अपेक्षा आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.