पुणे – भिडेवाडाकार विजय वडवेराव आयोजित जगातील पहिलाच आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे २०२५ पहिल्यांदाच एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय काव्य जागर पुणे फेस्टिवलचा कार्यक्रम दिनांक २ जानेवारी २०२५ ते ५ जानेवारी २०२५ पर्यत चालला यात जगभरातील साहशे हुन अधिक साहित्यिक उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय संमेलनात सर्व कवी कवयित्री सहभागी झाले होते या संमेलनात उत्रान येथील युवा कवी वैभव प्रभाकर महाजन यांनी सहभाग नोंदवून “भिडेवाडा” देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपली स्वरचित कविता सादर केली त्यांच्या प्रेरणादायी रचणेला टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यांचा सामाजिक तसेच साहित्य क्षेत्रातील योगदान व उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजक फुलेप्रेमी भिडेवाडाकार कवी तथा शिक्षक विजय वडवेराव सर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे पुस्तक, सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र , ,फुले प्रेमी नाव असलेली पेन देवून यांचा सत्कार करण्यात आला या आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये देश विदेशातील साहित्यिक कवी कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक पातळीवर सर्व स्थरातून कवी वैभव प्रभाकर महाजन यांचे कौतुक होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.