पाचोरा महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक  व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

0

Loading

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्गत संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा, जि. जळगाव येथे वार्षिक सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा स्पर्धा उत्साहात साजरी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 16 व 17 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले आहे.
     कार्यक्रमाची सुरुवात 16 जानेवारी

2025, गुरुवारी सकाळी 10.30 वाजता होणार असून उद्घाटन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचे अध्यक्षस्थान मा. दादासाहेब सुभाषजी तोतला (चेअरमन, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती) भूषविणार आहेत, तर उद्घाटक म्हणून

मा. अशोक पवार साहेब (पोलीस निरीक्षक, पाचोरा) उपस्थित राहतील.
   यासोबतच प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. दादासाहेब खलील दादामियाँ देशमुख (चेअरमन, व्यवस्थापन समिती, श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा), मा. भाईसाहेब दुष्यंतभाई रावल (संचालक, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था) आणि मा. प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष बुधा पाटील (एस.एस.एम.एम. महाविद्यालय,

पाचोरा) यांचा समावेश असेल.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध कला व कौशल्यविषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुद्धीमापन, वादविवाद, वक्तृत्व, काव्यवाचन, गीतगायन, रांगोळी, डिश डेकोरेशन, शेला-पागोटा, वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा यांचा समावेश आहे. या स्पर्धा 16 जानेवारी रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत संपन्न होणार आहे
     17 जानेवारी 2025, शुक्रवारी

सकाळी 10.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी अध्यक्ष म्हणून मा. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ (आमदार, पाचोरा-भडगाव) उपस्थित राहतील. याशिवाय मा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (प्रसिद्ध व्याख्याते व गझलकार, धुळे) आणि मा. धनंजय येरूळे साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून

लाभले आहेत.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने विशेष प्रयत्न केले आहेत. या समितीमध्ये मा. नानासाहेब संजय ओंकार वाघ (चेअरमन), मा. नानासाहेब व्ही.टी. जोशी (व्हा. चेअरमन, तसेच सिनेट सदस्य, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव), मा. दादासाहेब अॅड. महेश देशमुख (मानद सचिव) आणि अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
     कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. शिरीष बुधा पाटील (प्राचार्य), प्रा. डॉ. वासुदेव सोमाजी वले (उपप्राचार्य), डॉ. शरद पाटील (IQAC समन्वयप्रा.क), तसेच सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी व प्रा. राजेश वळवी यांच्यासह समस्त प्राध्यापक व कर्मचारी

वर्गाकडून करण्यात आले आहे.
     सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि सांस्कृतिक चैतन्य वृद्धिंगत करणे हा आहे.
   स्थळ: महाविद्यालय मुख्य इमारत, भगवंत रोड, पाचोरा
वेळ: 16 व 17 जानेवारी 2025, सकाळी 10.30 वाजता
   महाविद्यालय प्रशासनाने या भव्य कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करावा. असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here