पाचोरा- 1975 च्या आणीबाणीच्या काळावर आधारित, कंगना रणौत दिग्दर्शित ‘एमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आणि उत्सुकता निर्माण करत आहे. या ऐतिहासिक राजकीय चित्रपटात अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भूमिका समाविष्ट आहेत, ज्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे माझ्या शिक्षक जीवनातील विद्यार्थी आज प्रतिभावान अभिनेता भूषण शिंपी यांनी साकारली आहे.
भूषण शिंपी यांचा जन्म आणि शिक्षण जळगाव जिंल्ह्यातील पाचोरा, महाराष्ट्र येथे झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री गो से हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन

शिक्षण श्री एम.एम. कॉलेज, पाचोरा येथे झाले. शालेय जीवनातच ते अभ्यासू, हुशार आणि सर्जनशील प्रवृत्तीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथून अभियांत्रिकी पदवी मिळवली. मात्र, त्यांची अभिनयाची आवड आणि सर्जनशील दृष्टिकोन यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्राचा मार्ग स्वीकारला.
भूषण शिंपी यांनी अभिनयाचे तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी मध्य प्रदेश नाट्य विद्यालय, भोपाळ येथे 2015-16 साली रंगभूमी अभिनयातील पदविका पूर्ण केली. त्यांच्या मेहनतीमुळे आज ते हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण करू शकले आहेत.
भूषण शिंपी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, वेबसीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यांची काही महत्त्वाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
चित्रपट :-1. द बिग बुल (हॉटस्टार) 2-साईलन्स (ZEE5) 3-क्लास ऑफ 83 (नेटफ्लिक्स) 4-कुत्ते (विशाल भारद्वाज प्रॉडक्शन) 5-एमर्जन्सी (मणिकर्णिका फिल्म्स)
वेबसीरिज:- 1-स्कॅम 1992 (सोनी लिव) 2-शहर लाखोट (अमेझॉन प्राइम) 3-सँडविच (सोनी लिव) 4-महाराजा छत्रसाल
विशेष :-भूषण शिंपी यांनी मोठ्या ब्रँड्ससाठी 40 हून अधिक जाहिराती केल्या आहेत. यामध्ये एशियन पेंट्स, बिर्ला व्हाइट, पॉलिसीबझार, व्हिक्स, मालाबार गोल्ड, आणि रिलायन्स फ्रेश यांचा समावेश आहे. या जाहिरातींमुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली.
‘एमर्जन्सी’ चित्रपटात भूषण शिंपी यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भूमिका साकारली आहे. 1975 च्या आणीबाणीच्या काळात कमलनाथ हे महत्त्वाच्या राजकीय नेत्यांपैकी एक होते. भूषण यांनी त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याने ही भूमिका जिवंत केली आहे.त्यांनी अमिताभ बच्चन, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, प्रकाश राज, आणि कंगना राणौत यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे, ज्यामुळे त्यांच्या अभिनय क्षमतेचा उत्तम विकास झाला आहे.
भूषण शिंपी यांना हिंदी, मराठी, अहिराणी, आणि खान्देशी या भाषांचे ज्ञान आहे. विविध भाषांमधील संवादांची हाताळणी त्यांच्या अभिनयात ठळकपणे जाणवते.
शिक्षक असल्याचा अभिमान :- भूषण शिंपी यांचा अभिनयप्रवास, त्यांची मेहनत आणि साधलेले यश माझ्यासाठी म्हणजेच संदीप महाजन सरांसाठी एक शिक्षक म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. भुषण शालेय जीवना पासुनच हुशार आणि सर्जनशील विद्यार्थी होते, आणि आज त्यांनी आपल्या कौशल्याने एक वेगळा ठसा उमटवला आहे.
माझे जे जे विद्यार्थी- विद्यार्थीनींनी विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत झाले आहेत, त्यांनी आपले अनुभव आणि यशाचा प्रवास माझ्यापर्यंत पाठवावा. त्यांचा गौरव करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. निश्चितच त्यास प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करेल
पाचोरा कृष्णापुरी ( शिव कॉलनी) भागातील रहिवाशी भूषण शिंपी यांचा प्रवास हा मेहनत, समर्पण, आणि सातत्याने मिळणाऱ्या यशाचा आदर्श आहे. त्यांची जीवनकहाणी उभरत्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.
भूषण शिंपी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
“अभिनय हा केवळ कला नसून, तो कठोर परिश्रम, सातत्य, आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जिद्द आहे,” हे भूषण शिंपी यांच्या प्रवासाने सिद्ध केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.