पाचोरा(झुंज वृत्तपत्र&ध्येय न्युज प्रतिनीधी -अविनाश माळी, कुऱ्हाड Mo.9766719218 ) :- महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी “शिक्षणाचा हक्क कायदा” (आरटीई) अंतर्गत 25% शाळेतील जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये वयाच्या 4.5 ते 7.5 वर्षे वयोगटातील मुलं-मुली प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
आरटीईअंतर्गत मोफत शिक्षणाचे फायदे
आरटीई कायद्याच्या माध्यमातून गरीब व दुर्बल घटकांतील मुलांना नामांकित शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते. यामुळे आर्थिक अडचणीमुळे चांगल्या शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ होतो.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील:
मुलाचा जन्माचा दाखला
जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती-जमातींसाठी आवश्यक)
आधार कार्ड
प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
सेवाकेंद्रांमधून मिळणार मदत
शासनाने मान्यताप्राप्त केंद्रांवरून पालकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत केली जाणार आहे. या संदर्भात श्रीकृष्ण कॉम्प्युटर्स अँड झेरॉक्स या केंद्रावर विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
संपर्कासाठी माहिती :-
आरटीई अर्ज भरण्यासाठी पालकांनी संपर्क साधावा.
9730550993, 7020809022, 9970627033
पालकांसाठी आवाहन :- पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी शासनाने दिलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.
महाराष्ट्रातील अनेक पालकांसाठी आरटीई योजना ही आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी मोठी संधी ठरली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडवता येणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.