पाचोरा: जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा येत्या ८ फेब्रुवारी २०२५ रोजी, शनिवार, सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला, प्रतिभा आणि सृजनशीलतेला वाव देणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची भव्यता अधिकच वाढणार आहे.
या स्नेहसंमेलनात मा. खासदार स्मिताताई वाघ, आमदार मा. किशोरआप्पा पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. मधुकरभाऊ काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालक यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी आणि स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पथनाट्य, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य, तसेच “मोबाईल: शाप की वरदान?” या विषयावर प्रभावी नाटिका सादर करण्याचे नियोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाट्य, नृत्य, संवाद कौशल्ये आणि सृजनशीलता विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये सौ. निर्मला पाटील, सौ. प्रतिभा मोरे, सौ. रूपाली जाधव, सौ. प्रीती शर्मा, सौ. शीतल तिवारी, सौ. योगिता शेंडे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग आहे.
शाळेच्या वतीने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.