“माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश – पाचोरा तालुक्यात नव्या राजकीय युगाची सुरुवात!”- लक्षवेधी बातमी

0

पाचोरा -१० फेब्रुवारी २०२५ रोजी पाचोरा तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ माजवणारा आणि भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकणारा एक ऐतिहासिक निर्णय घेणारा दिवस ठरला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा औपचारिक प्रवेश होणार आहे. त्यानंतर पाचोरा तालुक्यातही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर स्वागत सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
या निर्णयामुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून दिलीपभाऊचा भाजप प्रवेश कार्यकर्त्यांना अपेक्षीत होता आता अधिकृत स्वरूपात अधोरेखित होत असून, या प्रवेशामुळे आगामी नगरपालीका , जिल्हा परिषद , पंचायत समिती सह विविध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला पाचोराभडगाव तालुक्यात अधिक प्रभावशाली बळकटी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून देशभरसह जिंल्हयात व पाचोरा तालुक्यात भाजपचा प्रभाव वाढत असून, अनेक नेते पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी घेतला, यामुळे त्यांनी मोठी संधी गमावल्याचे बोलले जात आहे. जर त्यांनी हा निर्णय पूर्वी घेतला असता, तर ?
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काही ठोस कारणांवर आधारित हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो.          1 ) राजकीय स्थैर्य आणि विकासाच्या संधी :– भाजप सध्या केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर सत्तेत आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये राहणे फायदेशीर ठरणार आहे.
2) संकट मोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याशी थेट संपर्क :– भाजपचे वरिष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांचे संपूर्ण राज्यात मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपभाऊ वाघ यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अधिक बळ मिळू शकते.                                 3) तालुक्यातील भाजपची ताकद वाढणार – पाचोरा तालुक्यातील अनेक समर्थक भाजपच्या वाटेवर येण्यास इच्छुक होते, मात्र स्पष्ट दिशेचा अभाव होता. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रवेशानंतर पाचोरा तालुक्यात भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तालुक्यात भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
ना गिरीशभाऊ महाजनसह इतर मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांनी दिलीपभाऊ वाघ यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला होता. अखेर त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.
“हा निर्णय उशिरा घेतला गेला असला तरी, तो योग्यच आहे. पाचोरा तालुक्याचा विकास, स्थानिक नेतृत्वाला चालना आणि भाजपच्या माध्यमातून अधिक प्रकल्प आणण्याची संधी मिळेल,” असे एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले.
.भाजप प्रवेशानंतर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे संपूर्ण राजकीय तज्ञांचे लक्ष लागले आहे.
विकासकामांना वेग:- भाजपच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याची संधी उपलब्ध होईल.
संघटन बळकट होणार:- तालुक्यातील भाजपचे संघटन आणखी मजबूत होईल.
नवीन नेतृत्व घडवण्याची संधी: – दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकर्त्यांना मोठ्या संधी मिळतील.
स्थानिक पातळीवर सत्ता मिळवण्याचे प्रयत्न:- पाचोरा भडगाव नगरपरिषद, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद पातळीवर भाजपच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न होतील.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा निर्णय नसून, हा संपूर्ण तालुक्यातील व मतदार संघाचा राजकीय दिशादर्शक बदल ठरणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या विकासाला देखील गती मिळेल.
लवकरच होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून हा बदल अधिकृतरित्या साजरा केला जाणार आहे. पाचोरा तालुक्यातील राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल, यात शंका नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here