मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई शहर असोसिएशन द्वारा आयोजित जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२४-२५ मध्ये अमर हिंद मंडळ संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळाला ५०-४२ अशा रोमांचक फरकाने हरवून अंतिम विजेतेपद पटकावले.
सदर सामन्यात अमर हिंद मंडळ संघाच्या खेळाडूंचा उत्तम खेळ दिसला. शाईशा पेंडणेकर, वेदिका करलोटकर, प्रांजल मोरे आणि मानसी रेडेकर यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षक साईनाथ काळसेकर आणि विजय राणे यांना यशस्वी नेतृत्वासाठी विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने संघाने आपला सर्वोत्तम खेळ सादर केला.
सदर स्पर्धा महिला कबड्डीसाठी एक महत्त्वाचा मंच ठरला असून, खेळाडूंच्या मेहनतीचा आणि प्रशिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा परिपाक म्हणून अमर हिंद मंडळाने विजय मिळवला.
सलोनी नाक्ती, मानसी रेडेकर, सौर्या तोडणकर, गार्गी गुरव, अज्ञा तोडणकर, अस्मी पाटील, सौम्या पाटील, रचना कवठनकार, प्रांजल मोरे, वेदिका तिरलोटकर, साईशा पेडणेकर, श्रद्धा कदम ह्यांनी अमर हिंद मंडळ संघाची शान वाढवली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.