पाचोरा : शहरातील प्रसिद्ध साखरचे व्यावसायिक व पाचोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पहलाज गोविंदराम वाधवानी (साई मोबाईल वाले) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची अंतिम यात्रा आज मंगळवार संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थानातून श्री संत बाबा थारयसिंह दरबार येथून निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाधवानी हे “84 SSC बॅच पाखरं ग्रुप” चे सदस्य होते आणि त्यांनी समाजकार्यातही सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने पाचोरा शहराने एक समाजसेवी व संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
भगवान त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती!
वाधवाणी परिवाराच्या दुःखात ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र परिवार सहभागी आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.