पाचोरा- जळगाव जिल्हा कोळी विकास मंचच्या माध्यमातून प्रथमच आदिवासी कोळी समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी नियोजन बैठक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी, सोमवारी सकाळी ११ वाजता, शासकीय विश्रामगृह, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या

बैठकीत वधू-वर परिचय मेळाव्याच्या आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. या महत्त्वाच्या उपक्रमासाठी भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, धरणगाव, अमळनेर, चोपडा आणि परिसरातील कोळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिवासी कोळी समाजाच्या तरुण-तरुणींना विवाहसंबंधी योग्य

जोडीदार शोधण्यासाठी ही एक अनोखी संधी असणार आहे. अशा परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील वधू-वरांना योग्य जीवनसाथी शोधण्याची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक उपक्रमांची चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे.
बैठकीचे आयोजन करणारे प्रमुख पदाधिकारी
संजय राघो कोळी, भडगाव ,अनिल भगवान सावळे, भडगाव,रघुनाथ तुकाराम कोळी, चाळीसगाव ,राजेंद्र खैरनार, पत्रकार, पाचोरा,गोपाळ शिवराम नन्नवरे, बांभोरी, ता. धरणगाव,सुनिल मोरे, पाचोरा,भरत विठ्ठल बाविस्कर, चोपडा,संभाजी शेवरे, पाचोरा
रामचंद्र कोळी, अमळनेर,मछिंद्र कोळी, चाळीसगाव,तुकाराम मोरे (सर), उमरखेडदशरथ शेवरे, बहाळ दिपक काकडे, जामदार,दशरथ जाधव, पाचोरा,सुनिल मोरे, भडगाव,भागवत सोनवणे, उत्राण
अण्णा कोळी, भडगाव,मेहरू शेवरे, वडजी
किशोर शेवरे, चाळीसगाव,दिपक सोनवणे, गिरड,समाजबांधवांना बैठकीसाठी विशेष निमंत्रण या बैठकीच्या माध्यमातून वधू-वर परिचय मेळाव्यासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयांची चर्चा होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाच्या सर्व इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या उपक्रमाचा भाग व्हावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती आणि संपर्क
संजय कोळी – 9970243208
अनिल सावळे – 7767019289
या ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर अधिक माहिती घेऊन नावनोंदणी करावी.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.