![]()
पाचोरा -विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखेच्या वतीने ‘स्मार्ट गर्ल कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थिनींना स्व-जागरूकता, आत्मरक्षा, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारी याविषयी

सखोल मार्गदर्शन देण्यात आले.ही कार्यशाळा हिंगोली येथील सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. रत्नाकर महाजन सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, आत्मनिर्भरता, स्वत:चा निर्णय घेण्याची क्षमता, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, संवादकौशल्ये, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व पोषणाचे महत्त्व, मैत्री आणि प्रलोभनांची ओळख आणि आई-वडिलांशी संवाद कसा साधावा या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीने आणि सखोल ज्ञानाने विद्यार्थिनींना कार्यशाळेतील प्रत्येक बाब समजून घेण्यास मदत केली. सध्याच्या आधुनिक

युगात महिलांनी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. त्यांना स्वत:च्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहता यावे, त्यांच्या निर्णयक्षमतेत वाढ व्हावी, सामाजिक परिस्थितीचा योग्य आढावा घेता यावा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठीच भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखेच्या वतीने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले रत्नाकर महाजन यांनी त्यांच्या सखोल

मार्गदर्शनात स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता: स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता: योग्य निर्णय कसा घ्यावा? कोणत्या बाबींचा विचार करावा? सामाजिक आचारसंहिता: समाजात वावरताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात?व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्य: आत्म-प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि प्रभावी संवाद कसा साधावा? आत्मरक्षण आणि सुरक्षितता: महिला सुरक्षेचे मूलभूत तत्त्व आणि आवश्यक तंत्र. मासिक पाळी

दरम्यान स्वच्छता आणि आरोग्य: शरीराच्या आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य माहिती. मैत्री आणि प्रलोभन: खऱ्या मैत्रीचे महत्त्व आणि प्रलोभन ओळखण्याची कला. आई-वडिलांशी मैत्रीपूर्ण संवाद: कौटुंबिक नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी संवाद कसा करावा? कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचे योगदान ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी भारतीय जैन महिला

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्नम घेतले यात.अध्यक्षा हर्षा संघवी जळगाव जिल्हा सचिव तृप्ती संचेती मित्तल शहा,खुशी बांठिया,प्रियंका संघवी प्रितिभा बाफना,कृतिका ओसवाल,हर्षाली छाजेड,लता बांठिया,सोनी जैन या सर्व जैन महिला संघटनच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आणि आयोजनासाठी

संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव श्री. संजयजी बडोला, खजिनदार आदरणीय जगदीशशेठ खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी, संचालक संजयजी चोरडीया, गुलाबजी राठोड, गोपालजी पटवारी, सौ. प्रितीजी जैन, महेंद्रकुमारजी हिरण, अशोककुमारजी मोर, शेखरकुमारजी धाडीवाल यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका

पुष्पलता पाटील, सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, शितल तिवारी, दिपिका रणदिवे, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, पिंकी जैन, राधा शर्मा, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदीप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तृप्ती संचेती यांनी केले, तर

संपूर्ण कार्यक्रमाच्या आभारप्रदर्शनाची जबाबदारी मित्तल शहा यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग यांच्यावर सकारात्मक प्रभाव पडला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि सामाजिक जबाबदारी याची जाणीव निर्माण झाली. अनेक विद्यार्थिनींनी या कार्यशाळेनंतर स्वत:च्या जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा संकल्प केला. विद्यार्थिनींनी स्वतःची ओळख समजून घेणे, आत्मनिर्भर होण्याची दिशा मिळवणे आणि समाजात सुरक्षिततेसह आत्मसन्मानाने जगण्याचे धडे गिरवणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. हा उद्देश विद्यार्थिनींनी पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखेच्या वतीने

राबविलेली ही ‘स्मार्ट गर्ल कार्यशाळा’ एक अत्यंत प्रभावी उपक्रम ठरला असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्याची योजना आहे. विद्यार्थिनींमध्ये आत्मनिर्भरतेचे नवे पर्व निर्माण करणाऱ्या या कार्यशाळेने एक नवीन प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




