Home Dhyeya News Special जे.डी.सी.सी. बँकेचे सेवानिवृत्त वसुली अधिकारी कै. भास्कर राजाराम शिंदे यांचे निधन; कुऱ्हे...

जे.डी.सी.सी. बँकेचे सेवानिवृत्त वसुली अधिकारी कै. भास्कर राजाराम शिंदे यांचे निधन; कुऱ्हे पानाचे व भुसावळ परिसरात शोककळा

0
149

Loading

भुसावळ: जे.डी.सी.सी. बँकेचे सेवानिवृत्त वसुली अधिकारी कै. भास्कर राजाराम शिंदे यांचे सोमवार पहाटे सुमारे ४.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७६ वर्षे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, माजी सहकारी तसेच परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. मूळचे कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ, जि. जळगाव येथील असलेले कै. शिंदे हे सध्या भुसावळ येथील जामनेर रोड, पेट्रोल पंपासमोरील परिसरात वास्तव्यास होते. जे.डी.सी.सी. बँकेत वसुली अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कामातील शिस्त, कर्तव्यनिष्ठा, सौम्य स्वभाव आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते सहकारी व नागरिकांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, दोन नाती तसेच विस्तृत आप्तस्वकीय असा परिवार आहे. पाचोरा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कॅशियर स्व. रतनमामा गायकवाड, देशमुखवाडी भागातील रहिवासी यांचे ते जावई प्रविण, राजेंद्र आणि रविंद्र रतन पाटील यांचे मेव्हणे होत. त्यामुळे पाचोरा, कुऱ्हे पानाचे आणि भुसावळ परिसरातील अनेक कुटुंबांशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दि.03 ऑगष्ट सायंकाळी ५.३० वाजता भुसावळ येथील जामनेर रोड, पेट्रोल पंपासमोरील राहत्या निवासस्थानातून निघून तापी नदीकाठी अंत्यसंस्कारासाठी रवाना होणार आहे. कै. शिंदे यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, गंधमुक्त कार्यक्रम दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भुसावळ येथील जामनेर रोड, पेट्रोल पंपासमोरील राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक व परिचितांनी उपस्थित राहावे, असे परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे. कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणारे, साधेपणाने आयुष्य जगणारे आणि माणुसकीची नाळ जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून कै. भास्कर राजाराम शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीयांवरच नव्हे, तर त्यांच्याशी स्नेहसंबंध असलेल्या सर्वच स्तरांतील व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुऱ्हे पानाचे व भुसावळ परिसरात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!