पाचोरा – महिलांचा जागतिक दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची संधीही आहे. याच उद्देशाने ‘गुजर सखी’ महिला मंडळाच्या वतीने शनिवार, दि. ८ मार्च रोजी सु. भा. प्राथमिक विद्या मंदिर, देशमुखवाडी, पाचोरा येथे भव्य आणि बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत होणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजन, पारंपरिक वेशभूषा प्रदर्शन, आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये…
१) एकल लोकनृत्य स्पर्धा – मराठमोळ्या ठसक्यात!
लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे पारंपरिक एकल लोकनृत्य (सोलो फोक डान्स) हे विशेष आकर्षण ठरणार आहे. महिलांना ३ मिनिटांच्या वेळमर्यादेत नृत्य सादर करता येईल. महाराष्ट्राच्या समृद्ध नृत्यपरंपरेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
२) मराठी वेशभूषा स्पर्धा – संस्कृतीचा गौरव!
महिलांनी पारंपरिक मराठी पेहराव करून या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. नऊवारी साडी, पैठणी,किंवा आपल्या बालपणातील मराठी पेहराव,महाराष्ट्रातील नामांकित मराठी महिला व्यक्तिमत्वाचे पेहराव..इत्यादींना प्राधान्य देण्यात आले आहे..
३) विनोदी उखाणा स्पर्धा – शब्दसौंदर्याची जादू!
महाराष्ट्रीयन लग्नसमारंभात रंगत आणणाऱ्या उखाण्यांची ही स्पर्धा महिलांसाठी खास ठेवण्यात आली आहे. मात्र पारंपरिक उखाणा न घेता विनोदी शैलीतील, चतुरस्र आणि सृजनशील उखाणे सादर करून सहभागी महिला आपली कलात्मकता सिद्ध करू शकतात.
४) ‘होम मिनिस्टर’ –ज्या महिला वरील तीन स्पर्धेत सहभागी होवू शकत नसतील त्या सर्वांसाठी घरगुती खेळांचा जल्लोष!
महिलांसाठी विविध घरगुती खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विनोदी आणि कौशल्यावर आधारित विविध खेळ खेळून महिलांना आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देता येईल.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी तिच्या आवडीचे खास वान तिला भेटवस्तू स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यासोबतच कोल्ड कॉफी आणि स्वादिष्ट अल्पोपहार यांचा आस्वाद घेण्याची संधीही महिलांना मिळणार आहे.
महिला आरोग्यासाठी विशेष उपक्रम: रक्त तपासणी शिबिर!
महिला दिनाच्या निमित्ताने ८ ते १० मार्च या कालावधीत महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. या तपासणीमध्ये रक्तगट, हिमोग्लोबिन पातळी, थायरॉईड, आणि रक्तातील साखर (शुगर लेव्हल) यांचे परीक्षण केले जाणार आहे. या तपासणीचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर करावी.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये:
✅ संपूर्णतः मोफत सहभाग – कोणत्याही स्पर्धेसाठी शुल्क आकारले जाणार नाही.
✅ वेळेवर सुरू होणारा कार्यक्रम – ठरलेल्या वेळेतच सर्व कार्यक्रम पार पडतील.
✅ सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन – मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
स्पर्धेसाठी संपर्क आणि नावनोंदणी:
स्वाती पाटील – 970440303
महिला दिनानिमित्त आयोजित हा विशेष कार्यक्रम महिलांना एकत्र आणण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे साधन ठरणार आहे. पारंपरिकतेची गोडी, स्पर्धेचा रोमांच, मनोरंजनाचा आनंद आणि आरोग्यविषयक जागरूकता एकत्र अनुभवण्यासाठी हा सोहळा नक्कीच अविस्मरणीय ठरेल!
असे आवाहन डॉ सौ सोनाली पाटील,सौ वैशाली पाटील,सौ शीतल महाजन यांनी केले आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.