पाचोरा – शहरातील श्री अंबाजी माता मंदिर यंदा आपल्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ४ मार्च २०२५, मंगळवार रोजी हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
मंदिर विश्वस्त आणि भाविक मंडळींनी हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित केला असून, महापूजा, पारंपरिक सोहळे, महाआरती आणि महाप्रसाद (भंडारा) या निमित्ताने भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
महापूजा: सकाळी ७.०० ते ९.०० पारंपरिक सोहळा: सकाळी ९.०० ते १०.३० महाआरती: सकाळी १०.३० ते ११.००
महाप्रसाद (भंडारा): सकाळी ११.०० ते दुपारी २.०० हा सोहळा श्री अंबाजी माता मंदिर, गांधी नगर, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून, मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने सजवला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर भक्तगण उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, आयोजकांनी आवश्यक व्यवस्थापन केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.