पत्रकाराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण – पत्रकार संदीप महाजन यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांची तातडीने कारवाई

0

पाचोरा: शहरात मोठी खळबळ उडवणाऱ्या
पत्रकाराच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात पत्रकार संदीप महाजन यांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिस प्रशासनाची तपास यंत्रणा सक्रिय झाली. तब्बल पाच दिवसा पासून बेपत्ता असलेली मुलगी केवळ १२ तासांच्या आत पोलीसांनी हरवलेली मुलगी आणि मुलगा शोधून ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी फारशी तत्परता दाखवली नव्हती. मात्र, पत्रकार संदीप महाजन यांनी व काही पत्रकार बांधवांनी या

प्रकरणाचा जोरदार पाठपुरावा करत पोलिस प्रशासना विरोधात आक्रमक भूमिकेमुळे तपास यंत्रणा वेगाने कार्यान्वित झाली मुलाच्या वडीलांना व नातेवाईक, मित्र यांना पोलीसी भाषा दाखवताच अल्पावधीतच पोलीसांनी आरोपींचा माग काढून मुलगी आणि मुलगा दोघांना ताब्यात घेतले.
     या घटनेनंतर नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अन्य प्रकरणांमध्ये तक्रारींची दखल घेण्यासाठी दिवसेंदिवस विलंब होतो, तपास ढिसाळपणे रेटला जातो, मात्र पत्रकारांनी

आवाज उठवताच १२ तासांतच गुन्ह्याचा उलगडा होतो, हे आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले.
     पत्रकार महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली असून, “सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्यावरील अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे. जर पोलिसांना योग्य पद्धतीने काम करण्यास भाग पाडले, तर तपासाची गती वाढते,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. आता सदर प्रकरणी पुढे काय होते आणि आरोपीस मदत केल्या प्रकरणी कोणाला आरोपी केले जाते व कोणाला अभय दिले जाते याकडे लक्ष लागुन आहे
    ही घटना पाचोरा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीचे प्रतिबिंब असुन पोलिसांनी केवळ दबावाखाली येऊन नव्हे, तर प्रत्येक प्रकरणात तत्परतेने काम करावे, अशी मागणी आता समाजातून होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here