पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व.गं.भा.नर्मदाआई धनसिंग पाटील यांचे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आणि सार्वजनिक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शोकसभेसाठी आणि कीर्तनासाठी परिसरातील मान्यवरांसह सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
स्व. गं.भा. नर्मदाआई यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शिवतीर्थ-चिंतामणी कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे या शोकसभेसाठी पाचोरा तसेच परिसरातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. स्व.गं.भा.नर्मदाआई पाटील यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासोबतच समाजासाठीही योगदान दिले. त्यांच्या सहृदय आणि दयाळू स्वभावामुळे त्या संपूर्ण परिसरात विशेष मान्यता प्राप्त व्यक्ती होत्या.आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मातोश्रीप्रती आपले भावनिक वक्तव्य करतांना सांगीतले
“आई ही आपली पहिली गुरू असते. तिच्या संस्कारांतूनच आम्ही समाजसेवा आणि लोकहिताची भावना बाळगतो. माझ्या मातोश्रींनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी तसेच इतरांसाठीही समर्पित भावनेने कार्य केले. त्या आम्हाला सोडून गेल्या असल्या तरी त्यांच्या शिकवणीने आणि विचारांनी आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन मिळत राहील.”
सर्वपक्षीय शोकसभेनंतर स्व. गं.भा.नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या आत्मशांतीसाठी एक सार्वजनिक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कीर्तन सोहळा दोन दिवस चालणार असून, यात दोन प्रसिद्ध कीर्तनकार आपली विचारधारा आणि आध्यात्मिक संदेश देणार आहेत.पहिले कीर्तन:
शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता
कीर्तनकार: ह. भ. प. समाधान महाराज भोजेकर
दुसरे कीर्तन: शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता कीर्तनकार: ह. भ. प. गोविंद महाराज वरसडेकर
या कीर्तनांच्या माध्यमातून जीवनाचे तात्त्विक स्वरूप, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जाणार आहे.
तर उत्तरकार्याचा कार्यक्रम – अंतिम श्रद्धांजली
शोकसभेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता उत्तरकार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे विधीवत धार्मिक कार्यक्रम असणार असून, परिवारातील सदस्य, आप्तेष्ट आणि नागरिक यात सहभागी होतील.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवसेना-युवासेना, महिला आघाडी, पाचोरा-भडगाव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पाचोरा आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी स्व.गं.भा.नर्मदाआई धनसिंग पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या आठवणी सांगितल्या. एका नागरिकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “त्या खूप प्रेमळ आणि संयमी स्वभावाच्या होत्या. समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी होते.”
हा शोकसभा आणि कीर्तन सोहळा केवळ श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम नाही, तर त्यांच्या स्मृतींना कायमचे जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. परिवार, समाज, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पाचोरा आणि परिसरातील सर्व नागरिकांना या शोकसभेसाठी उपस्थित राहणार आहेत
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.