डॉ. गणेश राठोड यांची ‘एम्का’च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड – एक सेवाभावाने प्रेरित नेतृत्वाचा नवा अध्यायसरचिटणीस पदी डॉ. सागर धडस यांची नेमणूक – अंबरनाथच्या वैद्यकीय क्षेत्रात नवचैतन्याचा शुभारंभ

0

अंबरनाथ – सामाजिक जबाबदारीची जाणीव, वैद्यकीय सेवेची निःस्वार्थ वृत्ती, आणि संघटनात्मक नेतृत्वाची प्रभावी शैली यांचा त्रिवेणी संगम म्हणजे डॉ. गणेश राठोड यांचे व्यक्तिमत्त्व. अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन (एम्का) च्या अध्यक्षपदी नुकतीच त्यांची सर्वानुमते निवड झाल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात नव्या उमेदीचा श्वास पसरला आहे. सरचिटणीस पदावर डॉ. सागर धडस यांची नेमणूक झाली असून, ही संपूर्ण कार्यकारिणी पुढील चार वर्षांसाठी आपल्या सेवेस सज्ज आहे.
डॉ. गणेश राठोड हे केवळ एक कुशल डॉक्टर नाहीत, तर ते एक संवेदनशील

समाजसेवकही आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ अंबरनाथ, पनवेल आणि चाळीसगावमध्ये सेवा बजावली आहे. ‘शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ या त्यांच्या सेवाभावी संस्थेद्वारे हजारो रुग्णांवर प्रभावी उपचार केले गेले आहेत. कोविड काळात अंबरनाथ शहरात त्यांनी घेतलेले निर्णय, अंबरनाथ पालिका प्रशासन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यात साधलेला समन्वय, हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण आहे.
अलीकडेच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्षपदी डॉ. गणेश राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सरचिटणीस डॉ. सागर धडस, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद बाळापुरे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष हांडे आणि डॉ. श्रीकांत गर्जे यांच्यासह सहसचिवपदी डॉ. आजरा शेख आणि डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचीही नियुक्ती झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. मयूरेश वारके, डॉ. शैलेंद्र गायकवाड, डॉ. यतीन भिसे, डॉ. ज्योती नायर, डॉ. प्रकाश कोलते, डॉ. किरण शिंदे, डॉ. नितीन जोशी, डॉ. स्वप्नील बार्डे आणि डॉ. लीना धांडे हे मान्यवर कार्यरत असतील.ही कार्यकारिणी वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांतील तज्ज्ञांनी युक्त असून त्यांच्या अनुभवाचा लाभ ‘एम्का’च्या सामाजिक प्रकल्पांना मिळणार आहे.
कोविडच्या संकटकाळात संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा आरोग्य व्यवस्थेवर ताण होता, तेव्हा अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनने जे काम केले, ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स या सर्वांनी संघटित पद्धतीने समाजासाठी जीव धोक्यात घालून सेवा केली. यामध्ये डॉ. गणेश राठोड यांची निर्णायक भूमिका होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संघटना एका छत्राखाली उभी राहिली आणि हजारो नागरिकांना दिलासा मिळाला.
‘एम्का’ने गेल्या अनेक वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील केवळ तांत्रिक सेवाच नाही, तर सामाजिक जाणीव असलेले उपक्रमही राबवले आहेत. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी हेल्थ अवेअरनेस कार्यक्रम, वरिष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सल्ला शिबिरे – हे सर्व ‘एम्का’च्या कार्याचा अविभाज्य भाग आहेत. डॉ. गणेश राठोड यांच्या नेतृत्वात हे उपक्रम अधिक व्यापक स्वरूप घेतील, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे.
डॉ. गणेश राठोड यांचा प्रवास एक प्रेरणादायी जीवनगाथा आहे. खानदेशातील चाळीसगाव सारख्या ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी पनवेल आणि अंबरनाथमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नात जावई असलेल्या डॉ. गणेश राठोड यांनी त्यांचा सन्मान टिकवत, आपल्या कृतीद्वारे वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
डॉ. गणेश राठोड यांच्या वैद्यकीय प्रवासात त्यांची पत्नी, सुप्रसिद्ध प्रसुती तज्ज्ञ डॉ. अरुणा राठोड यांची महत्त्वपूर्ण साथ आहे. घर आणि रुग्णालय यामध्ये समतोल राखत त्यांनी अनेक महिलांना आरोग्यसाक्षर बनवले आहे. डॉ. राठोड यांचे यश हे त्यांच्या कुटुंबाच्या सहकार्याचेही द्योतक आहे.
नवनियुक्त अध्यक्ष डॉ. गणेश राठोड यांनी अध्यक्ष पद स्वीकारताना स्पष्टपणे सांगितले की, अंबरनाथ शहरात नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वैद्यकीय शिक्षण, सेवा आणि समाजाशी संवाद – यांचा त्रिवेणी संगम साधत ही संघटना कार्यरत राहील, असे त्यांनी प्रतिपादन केले.
अंबरनाथसारख्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्र हे केवळ उपचार देणारे केंद्र न राहता, ते समाजाभिमुख भूमिका बजावणारे यंत्र बनले आहे. अशा काळात एम्का सारख्या संस्थेचे नेतृत्व सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीकडे असणे गरजेचे होते आणि म्हणूनच डॉ. गणेश राठोड यांची निवड अत्यंत योग्य वेळेस झाली आहे.
‘अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन’ ही संघटना केवळ तज्ञ डॉक्टरांची गटसंधी नाही, तर ही एक सामाजिक चेतनेची चळवळ आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ही संस्था अंबरनाथ परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि समाजसेवेची भूमिका अधोरेखित करत आहे.
आज या संघटनेत ४०० पेक्षा अधिक डॉक्टर्स कार्यरत आहेत – यात फिजिओथेरपिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर्स, सुपर स्पेशालिस्ट, आयुर्वेद व होमिओपॅथिक वैद्य, तसेच महिला डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना दरवर्षी सेवा मिळते आणि एम्का ही संस्था समाजाच्या आरोग्य रक्षक म्हणून ओळखली जाते.कोरोनाच्या काळात अंबरनाथ परिसरातील नागरिकांनी जे अनुभवले ते विसरणे अशक्य आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था जेव्हा ढासळू लागली होती, तेव्हा डॉ. गणेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली एम्का संघटना पुढे सरसावली. त्यांनी पालिका प्रशासन, पोलिस विभाग, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधून आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवली. तत्काल कोविड हेल्प डेस्क, ऑक्सिजन बेड व्यवस्थापन, कोविड टेस्ट ड्राइव्ह, वैद्यकीय हेल्पलाइन – या सर्व गोष्टी डॉ. राठोड यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाल्या. त्यांच्या या योगदानाची दखल महाराष्ट्र शासनाने सुद्धा घेतली आणि त्यांचा सन्मान केला.
नवीन कार्यकारिणी – समविचारी, कार्यक्षम आणि सामाजिक बांधिलकी जपणारी टीम
एम्का कार्यकारिणी म्हणजे वैद्यकीय सेवेचा एक बहुआयामी पथक. डॉ. सागर धडस हे सरचिटणीस म्हणून केवळ संघटनेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणार नाहीत, तर युवक डॉक्टरांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहेत. कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद बाळापुरे यांच्या अनुभवामुळे संस्थेचा आर्थिक आराखडा अधिक पारदर्शक बनेल.
उपाध्यक्ष डॉ. सुभाष हांडे आणि डॉ. श्रीकांत गर्जे यांच्या कार्यक्षमतेमुळे जिल्हास्तरावरही एम्का आपल्या उपक्रमांची व्याप्ती वाढवू शकेल. सहसचिव डॉ. आजरा शेख व डॉ. मंजुषा कुलकर्णी या दोघी डॉक्टर महिला आरोग्य क्षेत्रात सशक्त नेतृत्व देणार आहेत.खानदेशातील चाळीसगाव सारख्या ग्रामीण भागातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले डॉ. गणेश राठोड यांनी समाजसेवेला व्रत मानले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे पनवेलसारख्या शहरी भागातही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या ‘शिवकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ने हजारो रुग्णांना नवी आशा दिली आहे एम्का ही केवळ वैद्यकीय संघटना न राहता सामाजिक समरसतेचा आदर्श मंच म्हणून उदयास आली आहे. डॉ. गणेश राठोड यांचे नेतृत्व सामाजिक विविधतेच्या समन्वयासाठी ओळखले जाते. त्यांनी डॉक्टर्समध्ये जात, धर्म, वर्ग भेद न करता कार्यसंघात्मक दृष्टिकोन वाढवला आहे.
भविष्यातील दिशा – वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्यांपर्यंत
अंबरनाथ शहरात सुरू झालेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय ही एक ऐतिहासिक घटना आहे. डॉ. गणेश राठोड यांचे लक्ष्य हे केवळ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण नव्हे, तर समाजात दर्जेदार डॉक्टर घडवणे आहे. त्यांनी जाहीर केले आहे की एम्का संस्थेमार्फत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मेंटरशिप प्रोग्रॅम्स, व्यावसायिक कार्यशाळा, आणि इंटर्नशिप उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व गरजूंसाठी वैद्यकीय सल्ला केंद्र, टेलिमेडिसिन सेवा आणि मोबाईल हेल्थ व्हॅन यासारख्या योजना लवकरच सुरू होतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here