पाचोरा – शहरात मध्यरात्री पोलिसांनी राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान एका संशयास्पद वाहनातून गुटख्याची प्रचंड मोठी, अवैध खेप जप्त करण्यात आली. ही कारवाई एव्हढ्यावरच मर्यादित नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोगस पत्रकार, खोट्या संघटना आणि त्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या अवैध धंद्यांच्या एका अख्ख्या साखळीचा पर्दाफाश होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काल रात्री पोलिसांनी मोठ्या शिताफीने मिळालेल्या खबऱ्यांवर विश्वास ठेवून, शहराच्या ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी एका वाहनाची तपासणी करताना त्यामध्ये लाखोंच्या किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. वाहनासह मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यामागील रॅकेटचा तपास सुरू आहे.
पण खरी बातमी इथेच आहे — हा गुटखा केवळ एका तस्कराचा माल नाही. दिलीपसह हे रॅकेट कित्येक दिवसांपासून कार्यरत असून त्यास पाठबळ देणाऱ्या बोगस पत्रकार व त्यांच्या खोट्या संघटनांची
संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. शहरात गुटखा, लाकूड तस्करी, रेती वाहतूक करणाऱ्यांना ब्लॅकमेल करत बनावट ब्रेकिंग, खोट्या बातम्यांचे सौदे – हे सर्व एकाच साखळीचे दुवे असून पोलिसांच्या या कारवाईने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
पाचोऱ्यात काही वर्षापासुन अघोषित पत्रकारांनी तयार केलेल्या बनावट पत्रकार संघटनांनी आपले ‘पत्रकार’ म्हणून फोटो लावून, चार बोगस सहकाऱ्यांना पदे वाटून, हॉटेलमध्ये बसून साखळी निर्माण केली. या लोकांना सुरुवातीला कुणीही गंभीर घेत नव्हते, पण जेव्हा त्यांचा त्रास खऱ्या पत्रकारांना व अधिकाऱ्यांना होऊ लागला तसेच खऱ्या पत्रकारांचे फोटो, नाव, आणि संघटनांचे बॅनर वापरून पोलीस अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे, एखाद्या अवैध धंद्यावाल्याची ‘ब्रेकिंग’ टाकून पैसे उकळणे आणि पोलिसांवर दबाव आणणे सुरू केले, तेव्हा गंभीरतेने पाहणे आवश्यक झाले.
याच बोगस पत्रकारांच्या थापा व भंपकपणा मध्ये येऊन पाचोऱ्यातील काही चक्री अवैध धंदेवाल्यांनी त्यांना आर्थिक मदत सुरू केली, दरमहा पैसे दिले जात होते त्यामुळेच त्यांच्या तोंडाला पैसा नावाच्या रक्ताची चव लागली. आणि त्यांनी आपला मोर्चा थेट पिंपळगाव व भडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीकडे वळवला.तेथील थेट अधिकाऱ्यांना त्रास देणे सुरू केले पिंपळगाव व भडगाव परिसरातील अवधंदे वाल्यांकडे पोहोचताच या बोगस पत्रकारांनी पुन्हा तीच पद्धत सुरू केली. स्थानिक अवैध धंदेवाल्यांना म्हणू लागले, तुम्ही आता पैसे दरमहा सुरू करा लाकडे वाल्यांनो पैसे वाढवा नाहीतर पुन्हा ब्रेकिंग टाकू.” काही व्यापाऱ्यांकडे जाऊन धमकीवजा भाषेत सांगण्यात आले
त्यांच्या अशाच प्रकारामुळे पाचोरातील अवैध चकऱ्या स्थानिक पोलीस प्रशासनाने बंद केल्याने त्या संधीचाही उपयोग घेऊन इतर अवैध व्यवसायिकांना सांगू लागले
“आमची कमाल बघितली का? आम्हीच चक्रऱ्या थांबवल्या… तुम्हीही नीट राहा, नाहीतर तुमच्याही व्यवसायावर टाच येईल.”
या धमक्यांमागे प्रत्यक्षदर्शी पुरावे नसले तरी, अनेक व्यापाऱ्यांनी नोंदवलेल्या तोडी तक्रारी आणि माहितीवरून ही टोळी एकमेव उद्देशाने कार्यरत आहे – ‘दहशत निर्माण करून पैसा उकळणे.’ ते पत्रकार नाहीत, ते ‘ब्लॅकमेलिंग एजंट’ आहेत.
पाचोरा पोलिसांची योग्य वेळ साधलेली कारवाई – थेट चक्रालाच उद्ध्वस्त केले!
पाचोरा पोलिसांनी या संपूर्ण यंत्रणेची माहिती मिळवताच, केवळ बोगस पत्रकारांवर नव्हे, तर त्यांना खतपाणी घालणाऱ्या मूळ चक्री अवैध धंद्यालाच लक्ष्य केले. त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्या मुख्य मालमत्तांवर छापे टाकून, मुख्य खेप जप्त केली. परिणामी बोगस पत्रकारांची बडेजावशीर भाषा आणि धमक्या संपूर्ण थंडावल्या.
गमतीशीर बाब म्हणजे हीच मंडळी आता सांगत आहेत – “आमच्यामुळे चक्रा थांबल्या, आता आम्ही पुन्हा सुरू करतो. साहेबांना सांगून सगळं सुरळीत करू.” मात्र वस्तुस्थिती ही आहे की – पोलिसांच्या चौकस हालचाली, खबऱ्यांचं नेटवर्क मुळे पाचोऱ्यात चक्री व्यवसायाला ‘ब्रेक’ लागलं आहे.
हेच बोगस पत्रकाराचं रॅकेट लाकूड तोड प्रकरणातही बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. एखाद्या वनक्षेत्रात लाकूड चोरले गेले, तर लगेच एखाद्याला ‘खबरदार’ टाईप फोटो सोशल मीडियावर टाकायचा. त्यानंतर संबंधित व्यवसायिकाकडे जाऊन सांगायचं – “तुमच्यावर बातमी आलीय, ती थांबवायचीय? मग काही ‘डील’ करू.” यामध्ये अनेक वेळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही चुकीच्या पद्धतीने फोन रेकॉर्ड करून फसवले गेले आहे
अगदी रेती वाहतूक प्रकरणातही हेच बघायला मिळालं.बनावट पत्रकारांचे हे टोळके ‘पत्रकार संघटना’ या नावाने अधिकाऱ्यांकडे जाऊन, एकतर स्वतःची बाजू मांडून दुसऱ्यांवर आरोप ।करतं, किंवा पथकावर दबाव टाकून धंदा सुरू ठेवण्यास सांगतं.
शेवटी… हे पत्रकार नाहीत, ही एक आर्थिक ब्लॅकमेलिंग संस्था आहे!
सामान्य व्यापारी, डॉक्टर, कंत्राटदार, पत्रकार, अधिकारी – कोणताही समाजघटक सुरक्षित नाही, जोवर ही बनावट पत्रकार मंडळी शहरभर फिरत आहेत. त्यांच्या मागे असलेल्या अवैध धंद्यांनी त्यांना पैसा, संरक्षण, आणि बनावट प्रतिष्ठा दिली आहे. आता वेळ आली आहे या सगळ्याचा भांडाफोड करण्याची. Dhyeya News चे वाचक, सजग व्हा!आपल्या संघटनेचं नाव, फोटो कुठे वापरलं जातंय का?तुमच्याकडून एखाद्या ‘पत्रकाराच्या’ नावावर पैसे मागण्यात आलेत का?खऱ्या पत्रकारांचं नाव वापरून कुणी फसवणूक करतंय का?ताबडतोब संपर्क साधा. पोलिसांशी सहकार्य करा. माहिती द्या. आणि या बनावट यंत्रणेपासून पाचोऱ्याला, पिंपळगावला, भडगावला वाचवा.कारण ही केवळ पत्रकारितेची थट्टा नाही, ही समाजाच्या विश्वासाची घातक विक्री आहे!Dhyeya News खऱ्या पत्रकारांसोबत, खोट्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज!
लवकरच आणखी पुरावे, नावं आणि माहिती घेऊन परत येत आहोत! संपर्कात राहा!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.