पाचोरा तालुका सह शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि पाचोरा नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.गटनेते तथा मा.नगरसेवक म्हणून आपले कार्यक्षेत्र उत्तमरित्या पेलणारे, सहकार, शिक्षण, क्रीडा, आणि सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी योगदान देणारे नानासाहेब संजय ओंकार वाघ यांचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा क्षण नसून, त्यांच्या कार्याची उजळणी आणि सन्मान करण्याची संधी आहे.नानासाहेब वाघ यांचं व्यक्तिमत्त्व हे अत्यंत शांत, नम्र, संयमी आणि विचारशील आहे. ते नेहमी कार्य करतात, पण त्याचं श्रेय घेण्याची त्यांना कधीही हाव नाही. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे त्यांना स्वतःचं कौतुक, बडेजाव, बॅनरबाजी, दिखावा, आणि भपकेबाजपणा अजिबात आवडत नाही. त्यांनी आतापर्यंत कितीही मोठी कामं केली असली तरी त्याची प्रसिद्धी त्यांनी कधीच केली नाही. याउलट, ते लोकांच्या अडचणी समजून घेत, त्यांना सोडवण्याकरता कुठलाही आडपडदा न ठेवता, अत्यंत शांततेने, परिश्रमपूर्वक कार्य करत आले आहेत.सध्या जो गढुळ, गोंधळलेल्या आणि स्वार्थी राजकारणाचा काळ आहे, त्या पार्श्वभूमीवर संजयनाना वाघ यांचं नेतृत्व हे एक तेजस्वी आदर्श ठरतं. त्यांनी आपले पिताश्री स्व.आप्पासाहेब ओकार वाघ यांच्याप्रमाणे राजकारणाला सेवा आणि जबाबदारीचा मार्ग मानत लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांनी केवळ पदांवर राहून सत्ता उपभोगण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजकल्याणासाठी कसा करता येईल, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून अधोरेखित होतं.त्यांची कर्तव्यदक्षता इतकी प्रगल्भ आहे की, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या काळात किंवा राजकीय धोरण, नियोजन, प्रचार, प्रचाराची आखणी, कार्यकर्त्यांचं बळ एकवटणं, तसेच जनतेपर्यंत योग्य संदेश पोहोचवणं या सगळ्या बाबतीत नानासाहेब अगदी लक्ष्मणाच्या भूमिकेत राहून दिलीपभाऊंच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढेच राहतात. ते दिलीपभाऊंनी घेतलेल्या निर्णयप्रक्रियेत कधीही मागेही राहत नाहीत – त्यांनी नेहमीच आपलं बंधुभाव टिकवून कार्यक्षमता सिद्ध केली आहे. आज संजयनानांचा विचार करता हेही अधोरेखित करावं लागतं की त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक केंद्र न राहता एक मूल्यप्रधान संस्कारांचे केंद्र बनले आहे. त्यांनी शिक्षणात नवकल्पनांचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, गुणवत्ता आणि सामाजिक जाणिवा विकसित केल्या. संजयनाना यांचं सहकारातील योगदानही मोठं आहे. संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी पारदर्शी कारभार, व्यवस्थापन कौशल्य, आणि संघटन क्षमतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या सहकार चळवळीला राजकीय हेतू नव्हे तर आर्थिक आत्मनिर्भरतेचा उद्देश असतो.त्यांच्या सामाजिक कार्यातही माणूस हा केंद्रस्थानी असतो. कोणतंही संकट असो – आपत्ती, आजार, दुर्घटना, शोक – नानासाहेब लगेच धावून जातात. त्यांचं सर्वांशी नातं हे औपचारिक न राहता खऱ्या अर्थाने भावनिक आणि आपुलकीचं असतं. त्यांना ‘कॉमन मॅन’ म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.त्यांच्या शांत, संयमी आणि सौम्य वागणुकीमागे एक अत्यंत काटेकोर सुक्ष्म नियोजन असतं. त्यांच्या निर्णयप्रक्रियेच्या मागे नेहमीच लोकहित आणि शाश्वत विकास यांचा विचार असतो. त्यामुळेच पाचोरा नगरपालिकेच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले – कधी रस्त्यांसाठी, कधी पाणीपुरवठ्यासाठी, तर कधी सर्व स्तरांवरील जनतेच्या मूलभूत सुविधेसाठी असो आज नानासाहेब वाघ यांचा वाढदिवस हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी करत पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. ते केवळ आपल्या कामासाठी ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या माणुसकीसाठी, त्यांच्या शालीनतेसाठी आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या स्वभावासाठी ओळखले जातात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजबांधव, कार्यकर्ते, शिक्षक, पालक, सहकारी, नागरिक, युवक त्यांना शुभेच्छा देताना हेच म्हणतात की, “तुमच्यासारखं नेतृत्व लाभणं हे आमचं सौभाग्य आहे.” स्व आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्याप्रमाणे जनतेचा आवाज, कार्यकर्त्यांचा विश्वास, आणि समाजासाठी झिजणारा सच्चा नेता – संजय ओंकार वाघ – यांना वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा!
तुमची वाटचाल अशीच तेजस्वी, प्रेरणादायी आणि यशस्वी होवो, हीच प्रार्थना.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.