पाचोरा – तालुक्यातील परधाडे-वडगाव रस्त्याच्या साक्षीने एक धक्कादायक वास्तव समोर आले असून, येथील रेल्वे गेटजवळ विहिरीच्या बाजुने दुसखेड्याकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतांमध्ये चक्क कोट्यवधी रुपयांची जुगारात उलाढाल सुरू असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या गुप्त जुगार अड्ड्यांवर केवळ रोख पैशांचीच नव्हे तर वाहनं, शेती मालमत्ता, घरे, दागिने अशा मौल्यवान संपत्तीचीही व्यवहार खुलेआम होतो आहेत. जुगाराच्या या अड्ड्यांमध्ये व्यवहार इतके गतिमान असतात की, खेळाडूंची जशी हातचालाखी, तशीच क्लब चालवणाऱ्या मंडळींचीही जागरूकता वाचनीय आहे. पोलीस प्रशासन धाड टाकण्याच्या तयारीत असतानाच, गुप्त यंत्रणेमार्फत त्यांना आधीच सुगावा मिळतो आणि संपूर्ण अड्डा काही क्षणांतच रिकामा केला जातो. इतक्या सफाईदारपणे व नियोजनबद्ध रचनेने या जुगाराच्या अड्ड्यांचे संचालन केले जात आहे की, त्यामागे असलेल्या स्थानिक राजकीय आश्रयधारकांची शंका सहज निर्माण होते.
सध्या या क्षेत्रात जुगाराच्या प्रस्थाचा भडका इतक्या प्रमाणात उडाला आहे की, ग्रामीण भागातही आर्थिक पिळवणूक व सामाजिक ऱ्हासाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. शेतकरी, तरुण, सामान्य व्यापारी व मजुरवर्ग या जुगाराच्या मोहात फसत असून, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या जुगारातून हरलेल्या नागरिकांनी शेती गहाण टाकल्याच्या, घरे विकल्याच्या आणि अंगावरील दागदागिने गमावल्याच्या अनेक घटना स्थानिक पातळीवर घडल्या आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पत्रकार संदीप महाजन यांनी धाडसी पाऊल उचलत, परधाडे-वडगाव रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा ठावठिकाणा, लोकेशनसह सविस्तर तक्रार स्थानीक व वरिष्ठ स्तरावर पोलीस प्रशासनाकडे दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर अड्ड्याच्या मागे स्थानिक राजकीय व्यक्तींचा थेट पाठिंबाच नव्हे तर भागीदारी आहे त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा बिनधास्त पद्धतीने सुरू राहू शकतो आहे.
त्याचबरोबर, विश्वासार्ह वृत्तानुसार, नगरदेवळा गावाजवळील मोसंबीच्या शेतात मागील काळात चक्क एका पोलीस हे कॉ च्या भागीदारी असलेल्या क्लबची पत्रकार संदीप महाजन यांनी सदरच्या जुगार अड्ड्याची तक्रार दिली होती त्याची थेट दखल नासीक IG साहेब & पोलीस अधीक्षक जळगाव साहेबांनी घेऊन पाचोरा पो स्टे व नगरदेवळा औ पो ला कळू न देता बाहेरील यंत्रणा वापरून धाड टाकून हा अड्डा उद्ध्वस्त केला होता आता पुन्हा त्याच ठिकाणी आणखी एक मोठा जुगार अड्डा उभा राहत असल्याची माहितीही पत्रकार संदीप महाजन यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे. या अड्ड्याची रचना सुद्धा पूर्णपणे गोपनीय पद्धतीने केली जात आहे. शेतांमध्ये तयार केलेले तात्पुरते शेड, दाट झाडाझुडपांचा आडोसा, चारही बाजूंनी नजर ठेवणारी सशस्त्र गुप्त यंत्रणा, कोणताही संशय आल्यास काही क्षणात ठिकाण बदलण्याची क्षमता अशा पद्धतीने हा सगळा जुगाराचा मोठा गोरखधंदा उभा केला आहे या गंभीर प्रकारांमुळे परिसरातील सामान्य नागरिकांरीकांच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परधाडे-वडगाव रस्ता व आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे संशयास्पद हालचालींनी व्यापलेला असतो. सतत बाहेरगावच्या संशयित वाहनांची वर्दळही जाणवते. इतकेच नव्हे तर जुगार अड्ड्यांना गुप्त सुरक्षा देण्यासाठी गावठी कट्ट्यासह काही खासगी बाऊन्सर तैनात केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. युवकांना जुगाराच्या मोहातून बाहेर काढणे आणि गावाचा परिसराची नैतिक अधःपात थांबवणे हे सध्याच्या घडीचे मोठे आव्हान बनले आहे. या जुगार अड्ड्यांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे, कुटुंबांमध्ये कलह होणे असे सामाजिक परिणामही दिसून येतात.
या पार्श्वभूमीवर पत्रकार संदीप महाजन यांनी अत्यंत जबाबदारीने पुढाकार घेत पोलीस प्रशासनाला पत्राद्वारे तक्रार केली आहे आहे. त्यांनी आपली तक्रार करताना सदरचे गुगल लोकेशन देत मागणी केली आहे की, पोलिसांनी कोणतीही गडबड न करता, गुप्तपणे योग्य नियोजन आणि पूर्ण गोपनीयतेने अचानक कारवाई करावी. जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी तुटून पडल्यासच या अवैध उद्योगाचा बीमोड होऊ शकतो. या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पाचोरा तालुक्यातील या वाढत्या जुगार अड्ड्यांमुळे पंचक्रोशीतील अनेक कुटुंबांची घरे उद्ध्वस्त होत असताना, या सर्व प्रकरणात प्रशासन किती कठोर पावले उचलते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्याच्या घडीला जुगाराचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भागात पोलीस आणि प्रशासनाने काही कारवाया केल्या असल्या तरी त्या केवळ वरवरच्या राहिल्या आहेत. त्यामुळेच या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर समन्वय साधून एकात्मिक कारवाई होण्याची गरज आहे.
जुगार अड्ड्यांचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी केवळ पोलिसी कारवाई पुरेशी नाही, तर समाजातील प्रत्येक जागृत नागरिकानेही आपल्या स्तरावर सतर्क राहून माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा काही मोजक्या व्यक्तींच्या स्वार्थापायी संपूर्ण समाजाला मोठी किंमत मोजावी लागेल. गुप्त यंत्रणांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या जुगार अड्ड्यांमध्ये अनेकदा शहरी गुन्हेगारी गटांचे सदस्यही सहभागी होतात. काही वेळा अड्ड्यांमध्ये शस्त्रास्त्र बाळगण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे केवळ जुगार बंद पाडण्यापुरती कारवाई न करता, त्याचबरोबर तस्करी, गुन्हेगारी नेटवर्क्स यांचाही छडा लावणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकार संदीप महाजन यांचे हे पाऊल त्यांच्यासाठी जीवाला धोकेदायक व चॅलेंजिंग असून सुद्धा त्यांच्या माध्यमातून समाजातील गडद अंधारात लपलेले वास्तव प्रकाशझोतात येऊ लागले आहे. समाजहितासाठी धोक्याची पर्वा न करता त्यांनी उचललेले हे धाडस तालुक्यातील इतर पत्रकारांसाठी व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरावे असेच आहे. आता प्रशासनाने संपूर्ण तयारीनिशी गुप्त कारवाई करत या जुगार अड्ड्यांना नेस्तनाबूत करावे, जुगारबाजांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि तालुक्याला या कर्करोगापासून वाचवावे, अशी जोरदार मागणी महाजन यांनी केली आहे इतर ही अड्डयांची सविस्तर माहिती लवकरच
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.