सोलापूर (गुरुदत्त वाकदेकर) : काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर या राज्यस्तरीय साहित्यिक संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठी साहित्य प्रांतातील सर्वोत्कृष्ट रचनांना “काव्यप्रेमी साहित्य पुरस्कार” तर काव्यप्रेमी परिवारातील सर्वोत्कृष्ट योगदानाकरिता “काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते. यंदाचे साहित्य व प्रेरणा पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून सदर पुरस्कार वितरण सोहळा चिपळूण (रत्नागिरी) येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ११ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
काव्यप्रेमी साहित्य पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत “बु. कोकीळा शेजवळ स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (डॉ. दाक्षायणी पंडित, पुणे), स्व. जयवंती तावडे स्मृती सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (सौ. नीला नातू, रत्नागिरी), स्व. यशवंत चिंधू नेरे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (सौ. सीमा झुंजारराव, मुलुंड), स्व. भिमाई बाविस्कर स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार (अविनाश चिंचवडकर, बेंगलुरू कर्नाटक), एडव्होकेट कॉ. मदन फडणीस स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (किरण वेताळ, पुणे), स्व. रूक्मिणीबाई नारायण चवडेकर स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार (डॉ. स्नेहल कुलकर्णी, गारगोटी), दिलीप गोविंद दमाणे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (नयना निगळ्ये, न्युयॉर्क, अमेरिका), सौ. सुंदर बोंगाळे स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार (सौ. सई बने, डोंबिवली), कै. मातोश्री रत्नाबाई घोडके सर्वोत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार (आनंद सांडू, चेंबूर), स्व. विष्णूपंत माळोकार स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार (डॉ. दिनेश वाघुंबरे, सांगली), शंकर घोरसे सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार (विजय जोशी, डोंबिवली) व (सौ. रश्मी गुजराथी, पुणे) यांना विभागून. तर जाहीर झालेले काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार पुढीलप्रमाणे “स्व. बळवंत पाटील स्मृती प्रेरणा पुरस्कार- मुकेश विशे, ठाणे”, “कै. श्रीमती उमा शंकरराव कुलकर्णी स्मृती प्रेरणा पुरस्कार- सौ. कविता दाते, वर्धा”, “स्व. सौ. मंगला मदन फडणीस स्मृती प्रेरणा पुरस्कार – गजानन पाटील, सांगली”, “कै. चंद्रकांत शिवराम दिनकर स्मृती प्रेरणा पुरस्कार – प्रमोद भागवत, अमरावती”, “कै. मीराबाई प्रल्हादराव भांदर्गे स्मृती प्रेरणा पुरस्कार – श्रीमंत कोळी , सोलापूर”, “कै. रामा खंडू देवकते मार्डीकर स्मृती प्रेरणा पुरस्कार – सिराज शिकलगार, सांगली”, “कै. सौ. संजिवनी यशवंत मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार – श्रीम. अश्विनी धाट, धाराशिव”, “कै. मातोश्री सौ. वेणू महादेव आत्राम स्मृती प्रेरणा पुरस्कार – गणेश खडके, अमरावती”, “कै. लक्ष्मण राजाराम राजेगांवकर स्मृती प्रेरणा पुरस्कार – सौरभ नवले, पुणे” आणि यंदाचा काव्यप्रेमी जीवनगौरव पुरस्कार मुंबईतील विजय फडणीस यांना देण्यात येणार आहे.
“काव्यप्रेमी साहित्य व प्रेरणा पुरस्कार वितरण” या सोहळ्याचे उद्घाटन काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक, पुराणवस्तू अभ्यासक प्रकाश देशपांडे हे करणार आहेत. तर कृषीभूषण, ज्येष्ठ साहित्यिक, म.सा.प.चे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून को.म.सा.प.रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, को.म.सा.प.चे केंद्रीय कार्यवाह माधवजी अंकलके, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणचे कार्यवाह सुनिल खेडेकर, लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष तथा कवी, नाटककार, बोलीभाषा अभ्यासक अरूण इंगवले, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक सचिव कालिदास चवडेकर यांच्यासह काव्यप्रेमी राज्य समितीचे उपाध्यक्ष राज भिंगारे, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, काव्यप्रेमीचे राज्य सदस्य राष्ट्रपाल सावंत, प्रमोद बाविस्कर, सौ. जया नेरे, सत्येंद्र राऊत, नवनाथ खरात व रामदास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट १२वे वंशज डॉ. शितल मालुसरे, पुण्याचे ज्येष्ठ गझलकार बबन धुमाळ, आटपाडी वाचन उपक्रमाचे कार्यवाह दिनेश देशमुख, नागपूरचे कवी शंकर घोरसे, कराडचे चंद्रकांत कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कवी संमेलनाचे तीन सत्र संपन्न होणार आहेत. सदर संमेलनासाठी राज्य भरातून शिवाय बेंगळुरू, न्यूयॉर्क येथून काही कवी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य संयोजक राष्ट्रपाल सावंत यांनी सांगितले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.