आधी लगीन देशसेवेचं, मग संसाराचं! पाचोऱ्याच्या मनोज पाटलांनी हळदी सुकण्याआधीच थेट मातृभूमीच्या मंगळसूत्रासाठी वर्दी परिधान केली!

Loading

भारताच्या मातेची कोख जर शूरवीरांना घडवते, तर त्याचा जगता जागता पुरावा म्हणजे पाचोऱ्याचा जवान मनोज पाटील! एका बाजूला विवाहाच्या मंगल धून वाजत होत्या, मेहंदीच्या रंगात स्वप्नं रंगत होती… आणि दुसऱ्याच क्षणी देशाची हाक आली. अनेकजण असले प्रसंग टाळून “थोडं थांबवू या” म्हणाले असते. पण हा मनोज, खऱ्या अर्थाने वीर मराठ्याचा अवतार! त्याने थेट वर्दी चढवली आणि तिरंग्याच्या छायेखाली सीमेवर निघून गेला.
   देशात ऑपरेशन सिंधुरच्या रुपाने एक निर्णायक रणसंग्राम सुरू झाला आहे. पाकपुरस्कृत भ्याड दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी जय भवानीचा गजर करत घाव घालायला सुरुवात केली आहे. अशा निर्णायक टप्प्यावर मनोज पाटील याला सुट्टी संपवून तत्काळ परत बोलावण्यात आलं.

https://youtu.be/zakuD0bZ8ko?si=EFUmskj3I2mXnqwi              “मेहंदीही सुकली नव्हती… आणि फौजी मनोज पाटील देशासाठी युद्धभूमीकडे निघाला!”

मनोजचा विवाह नुकताच पार पडलेला होता. नववधूच्या डोळ्यांत भविष्याचं विश्व होतं. पण हाच क्षण मनोजसाठी कसोटीचा होता — आणि त्याने कर्तव्याचं चुकार उत्तर नाही, तर रणगर्जनेनं ‘होय’ दिलं!
  “देशाच्या माळेसाठी मी मंगळसूत्र थांबवू शकतो”, हे शब्द नाही, हे रक्तात वाहणारं छत्रपती शिवरायांचे स्वराज्याच्या मातीचे बाणेदार संस्कार होतं. आणि म्हणूनच, मनोजसारखे जवान हे फक्त सैनिक नसतात, ते देशाच्या अस्मितेचे शिवरायांच्या स्वराज्याचे मावळे असतात!
  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी घरी जाऊन सत्कार केला, हे स्वागताचं नव्हे, तर भारतमातेच्या सुपुत्राला मानाचा मुजरा होता. अशा मुलाने मातृभूमीच्या संरक्षणासाठी जाणं, हे एक कर्तृत्व नव्हे, तर पिढ्यांना प्रेरणा देणारं उदाहरण आहे.
पाचोरा शहरातील स्व. राजीव गांधी कॉलनीतून निघालेला हा जवान, पाचोरा रेल्वे स्थानकावरून सीमेवर रवाना होताना त्याच्या पाठीशी उभं होतं त्याचं कुटुंब, गाव आणि एक देश! आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण मन अभिमानानं फुललेलं होतं. पत्नी यामिनीच्या ओठांवर मौन होतं, पण डोळ्यांत “माझा पती नाही, माझा देशाची ढाल आहे” हा गर्व होता!
     गावकऱ्यांनी सांगितलं, “हा आमचा सैनिक आहे, जो गरज पडली तर शंभर पाकिस्तानींच्या छाताडावर बसून भारतमातेला जयजयकार करील.” आणि हे फक्त शब्द नव्हे, हे त्या मातीतल्या मर्द मराठ्यांचे भाव होते.
   आजच्या भारताला अशाच ताठ मानेच्या, तलवारीसारख्या सरळ आणि आकाशासारख्या विशाल मनाच्या जवानांची गरज आहे. हे युद्ध केवळ सीमा राखण्यासाठी नाही — हे भारताच्या अस्मितेसाठी आहे. आणि त्या रणांगणात मनोजसारखा वीर जर उभा असेल, तर कोणाची बापाची हिम्मत नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहील.
  मनोज, तू तानाजी मालुसरेंची आठवण करून दिलीस. तू आम्हाला परत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पवित्र गर्जना ऐकवलीस – “ज्याच्या रक्तात राष्ट्र आहे, तोच खरा सैनिक!” तू फक्त नवविवाहित नाहीस, तू भारतमातेसोबत सात जन्माच्या नात्याची गाठ बांधली आहेस.
पाचोऱ्याच्या भूमीत जन्मलेला हा शूरवीर आज संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण हिंदुस्थानचा पुत्र झाला आहे. याच्या वर्दीला नतमस्तक व्हा, आणि याच्या अर्धांगिनीला अभिमानाने सांगू द्या – माझा पती माझ्या संसाराचा राजा नाही, तो भारतमातेचा अभेद्य किल्लेदार आहे.
  जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here