![]()
भडगाव- तालुका संतप्त झाला होता. मानवी संवेदना हादरवून टाकणाऱ्या एका दुर्दैवी, अमानुष आणि क्रूर घटनेमुळे भडगावसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. धुळे येथील आपल्या सासरी वास्तव्यास असलेल्या भडगावच्या माहेरच्या शारदा (पूजा) बागुल (माळी) या तरुण विवाहितेवर तिच्या सासरच्यांकडून कथितरित्या अमानुषपणे मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ज्या पद्धतीने उघडकीस आली आहे, त्याने समाजमन सुन्न झाले असून, ह्या दु:खद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि शारदाला न्याय मिळावा यासाठी भडगावमध्ये आज सर्व पक्षीय व धर्मीय प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील,वैशालीताई सुर्यवंशी, योजनाताई पाटील ,साहेबराव महाजन, भाजचे अमोल शिंदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, शशिकांत येवले, गणेश परदेशी, सचिन चोरडिया, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील, एकनाथ महाजन, दिपक महाजन दिपक महाजन, शिवसेना तालुकप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, प्राजक्ता ताई देशमुख भाजपच्या नूतनताई पाटील, नितीन महाजन, सागर महाजन, युवराज पाटील, मनोहर चौधरी, डॉ प्रमोद पाटील, डॉ नीलेश पाटील, डॉ विलास पाटील, ऍड नीलेश तिवारी, प्रहारचे विजय भोसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनील वाघ, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, सेनेचे लरवीचंद पाटील, शिवदास महाजन,
अनील वाघ, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, सेनेचे लरवीचंद पाटील, शिवदास महाजन, महेंद्र ततार, रवी अहिरे, अजय चौधरी, पिनु महाजन, अतुल पाटील, अमोल पाटील, माजी उपसभापती संभाजी भोसले, नीलेश मालपुरे, ठेकेदार संभाजी पाटील,यांची प्रभावी उपस्थिती होती. या मोर्चाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही एका पक्षाचे नव्हते, तर सर्वपक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जाती-धर्मातील भडगावकरांनी मनापासून सहभाग नोंदवला होता. शारदावर झालेल्या अमानुष अन्यायाविरोधात आणि आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी अखिल भडगाव शहर एकत्र आले होते. शारदा (पूजा) बागुल ही भडगावची माहेर वाशिण. तिचे लग्न धुळे जिल्ह्यातील एका ठिकाणी झाले होते. मागील काही काळापासून तिला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा गावपातळीवर सुरु होती. मात्र अचानक तिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडल्याने आणि त्या आधी तिला मारहाण झाल्याचे स्पष्ट चिन्हे आढळल्याने, ही बाब केवळ आत्महत्या नसून, हत्या असल्याचा कळस सर्वत्र झाला आहे.
या घटनेमुळे तिच्या माहेरी आणि भडगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, अशा घटनांना पूर्णविराम देण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. घरगुती हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिला ही समाजाची खोल आणि काळोखी बाजू दाखवते. शारदा हिने अशा क्रूरतेचा बळी जावा, हे कुणालाही मान्य नाही. पाचोरा – भडगावातील सामाजिक जाणिवा जागृत करणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ. त्यांना शारदाच्या हत्येची माहिती व मोर्चा असल्याचे समजताच तातडीने पुढाकार घेत आज भडगावमध्ये ऐतिहासिक अशा सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय लोकांचा प्रचंड जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले
या मोर्चाने पोलीस स्टेशनकडे धडक देत, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबीयांना सुरक्षा व कायदेशीर सहाय्य मिळावे, असा ठाम पवित्रा घेत निवेदन सादर केले. या निवेदनावर भडगावच्या नागरिकांचे शेकडो स्वाक्षरी होत्या
या संपूर्ण मोर्चात सौ. जयश्रीताई पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा, यांनी देखील निर्णायक भूमिका घेतली. त्यांनी शारदाच्या घटनेवर प्रखर शब्दांत संताप व्यक्त करत, “महिलांवर होणारा कोणताही अन्याय आता सहन केला जाणार नाही. शारदा ही आपल्या समाजातील प्रत्येक बहिण आहे. तिच्यावर जे घडलं, ते आमच्यापैकी कुणासोबतही घडू शकतं. त्यामुळे आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही,” अशा शब्दांत भावनांना वाट मोकळी करून दिली.
या मोर्चात शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, शेतकरी अशा विविध थरांतील लोक एकत्र आले होते. ‘शारदाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘गृही हिंसाचारविरोधात कठोर कायदा हवा’, ‘गृहोपयोगी हत्या खपवून घेतली जाणार नाही’, ‘निर्घृण हत्येच्या आरोपींना फाशी दे’, अशा घोषणा शहराच्या रस्त्यांवर घुमत होत्या
मोर्चा भडगाव पोलीस ठाण्यावर पोहोचल्यावर एका ठरावीक निवेदनाद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करावी, आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, शारदाच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी, पीडितांच्या बाजूने वकील आणि न्यायलयी सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. भडगावचे पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारताना संबंधित माहिती वरिष्ठांकडे पाठवली जाईल आणि यथायोग्य कारवाई होईल, असे सांगितले. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुठल्याही एका पक्षाचा झेंडा नव्हता. सर्वपक्षीय कार्यकर्ते, अगदी प्रतिस्पर्धी राजकीय विचारांचे लोक देखील फक्त शारदासाठी एकत्र आले होते. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे संयोजन, सौ. जयश्री पाटील यांचा सहभागा आणि सामान्य जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे हा मोर्चा केवळ निषेध म्हणून नव्हता, तर एक सामाजिक शक्तीप्रदर्शन बनला.मोर्चा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले, “हे केवळ सुरुवात आहे. जर आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ, महिला आणि जनतेच्या हक्कासाठी आंदोलन तीव्र करू. आम्हाला कोणताही राजकीय लाभ नको, फक्त शारदाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.”
भडगावसारख्या छोट्या शहरात वावरलेल्या, सर्वांना हसतमुखाने सामोऱ्या जाणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या, सासरी जाऊन नवजीवन सुरु केलेल्या शारदाचा असा अंत होईल, असे कुणीही स्वप्नातही विचार केला नसेल. तिचा चेहरा आता केवळ तिच्या आईवडिलांच्या आठवणीत, तिच्या सखींच्या डोळ्यात आणि समाजाच्या काळजात राहील शारदा (पूजा) बागुलच्या हत्येप्रकरणी जोपर्यंत सर्व आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, आणि न्यायप्रक्रिया प्रभावीपणे सुरु होत नाही, तोपर्यंत भडगावचा जनतेचा आक्रोश तसाच राहणार, हे या मोर्चातून स्पष्ट झाले आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्यासारख्याच्या सहभागाने व सर्वपक्षीय माध्यमातून हा लढा न्यायासाठी अधिक प्रभावी होणार आहे, याची भडगावकरांना खात्री वाटते. शेवटी, हा लढा केवळ शारदासाठी नाही, तर प्रत्येक अत्याचारित महिलेसाठी आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































