स्वामी संस्थेचा उपक्रम : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अँड एन्व्हायर्नमेंट (स्वामी), परळ या सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबवली जाणारी विद्यार्थी सहाय्य योजना यंदाही उत्साहात पार पडली. या वर्षी सुमारे ३१० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सदर उपक्रम स्वामी संस्थेच्या कार्यालयाबाहेर पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. यतीन पटेल आणि सीए श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश लाड (संस्थाध्यक्ष) होते. या प्रसंगी मोहन कटारे (कार्याध्यक्ष), वैशाली शिंदे (उपाध्यक्ष), उल्हास हरमळकर (खजिनदार), गोविंद राणे (सचिव), रचना खुळे, प्रतिभा सावंत, रश्मी नाईक, प्रतिभा सकपाळे, योगिनी लाड, सुमंगल गुरव, ममता खेडेकर, सुरेखा निमकर, विमल माळोदे, नम्रता पडवळ, लखबिर कौर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन फुलस्केप वह्या, कंपास पेटी, परीक्षेचा पॅड, वर्कशीट, रंगपेटी, सर्टिफिकेट फोल्डर इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

विद्यार्थी सहाय्य योजना प्रकल्पप्रमुख गीता नाडकर्णी, नीलम सावंत, गायकर मॅडम, रीना महाडीक, अस्मिता घरत, स्वाती मयेकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या आयोजनात प्रदिप ढगे, अनिल तावडे, विलास पाटील, कांतीलाल परमार, शिवाजी गावकर, विष्णू मणियार, दिलीप मेस्त्री, अजय सुर्वे, शैलेश तुम्मा, दशरथ खमितकर, विश्वनाथ तेलकर यांचे मोलाचे योगदान लाभले.

विद्यार्थ्यांच्या मनोगतामधून संस्थेच्या उपक्रमाची फलश्रुती स्पष्ट झाली. कु. सोहम मयेकर (दहावी) याने सांगितले, “मी पाचवीपासून स्वामी संस्थेच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचा लाभ घेत आहे. दरवर्षी मिळणाऱ्या साहित्यामुळे माझ्या पालकांवरील आर्थिक भार कमी झाला आहे.” तसेच कु. आयुष सकपाळ (दहावी) म्हणाला, “मी सहावीपासून स्वामी संस्थेच्या योजनेत सहभागी असून, यामुळे मला शिक्षणात सातत्य ठेवता आले.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे उदय पारकर, उर्मिला जाधव, तृप्ती पवार, किरण करलकर, गणेश अंबोकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

स्वामी संस्था ही गेली १९ वर्षे शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या योजनेद्वारे अनेक गरजू विद्यार्थ्यांना आधार देत संस्था ‘शिक्षण हेच भविष्य’ हे मूल्य जपत आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here