पाचोरा – सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावच्या अध्यक्षस्थापना व नवीन संचालक मंडळाच्या नियुक्तीचा सोहळा आज, रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडेन्सी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
आज रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत येणाऱ्या या क्लबच्या अध्यक्षस्थापना या सोहळ्याला “UNITE FOR GOOD” हे प्रेरणादायी घोषवाक्य लाभले असून, सामाजिक विकासाच्या दिशेने रोटरीची पुढील वाटचाल यानिमित्ताने निश्चित होणार आहे. या विशेष कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२५-२६ रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष आणि संचालक मंडळाची औपचारिक स्थापना होणार आहे. तसेच कार्यक्रमाला विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील,रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर किरण देशमुख हेही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
2025-26 या कार्यवर्षासाठी रो.डॉ. मुकेश तेली हे अध्यक्षपद भूषवणार असून, सचिवपदी रो.डॉ. अजयसिंह परदेशी यांची निवड झाली आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली यावर्षी रोटरी क्लब विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या सोहळ्याचे अध्यक्ष यजमानपद क्लबचे विद्यमान अध्यक्ष रोटेरियन डॉ. पवन पाटील आणि सचिव रोटेरियन डॉ. शिवाजी शिंदे हे पार पाडणार असून, विविध मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्याची त्यांनी तयारी पूर्ण केली आहे
कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, रोटरीच्या स्थानिक सदस्यांसोबतच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, डॉक्टर, व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तरी निमंत्रितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून, पाचोरा व भडगाव परिसरातील रोटरी सदस्यांमध्ये उत्सुकता व आनंदाचे वातावरण आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.