पाचोरा – पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच बस स्टॅड प्रकरणात, गोळीबार प्रकरणातील आरोपी शरद युवराज पाटील याला पोलिस स्टेशनमधून बाहेर नेताना आणि पोलीस वाहनात बसवत असताना तयार केलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.त्यामध्ये दुर्लभ कश्यप डॉनसदृश शैली दिसून येते.
या व्हिडिओचा उद्देश काय आहे यावर चर्चा सुरु असून,हेच समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे साधन आहे. तरी देखील पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दाखल घेण्यात आली नाही आणि VDO काढणारे व प्रसारित करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्यात आली नाही अशाच स्वरूपाचं बस स्टँडवर मयत आकाश मोरे याने “तुम्ही हवेत गोळ्या मारतात आम्ही छातीवर गोळ्या मारतो ” या इंस्टाग्राम वर प्रसारित झालेल्या रिलची त्याचं वेळी दखल घेतली असती & “कोणी हवेत गोळ्या झाडल्या होत्या” हा रिल का? & कोणासाठी बनवण्यात आला होता ? कृष्णापुरी भागातील कोणते युवक & कधी पासुन? कोणाच्या टार्गेटवर आहेत? अल्पवयीन मुलांपर्यंत गावठी कट्टे व रिव्हाल्वर पोहचण्याचे व देण्याची यंत्रणा कोणती? यांचा गॉडफादर कोण? या दिशेने तपास केला असता तर शिवाजी नगर मधील नातेवाईकाच्याच हातुन नातेवाईकाची हत्या झाली नसती आणि खरा मास्टर माईड व सर्व सुत्रे तेव्हाच समोर आले असते अजुनही वेळ गेलेली नाही बरेच काही मोठे रॅकेट समोर येऊ शकते कारण यापूर्वीही पत्रकार संदीप महाजन यांना याच शरद पाटील व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांव्दारे व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. या घटना सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहेत. त्यांची एवढी दहशत आहे की त्यांच्या अवैध धंद्यांना देखील कोणी कारवाई अथवा धाड टाकायची हिंमत करत नाही
या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात पिस्तोल विक्री करणारे व गुन्हेगारी रॅकेटच्या कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही कारवायांमध्ये अंमलबजावणी अपुरी किंवा त्रुटीयुक्त असल्याचे आरोप देखील होत आहेत.पिस्तूल कोठून आली आणि कुठून येतात व पाचोरा येथे कोण विक्रेता आहे आज पर्यंत त्यांनी पाचोरा शहरात किती पिस्तोल विक्री केल्यात याचा कोणताही तपास करण्यात आलेला नाही एवढेच नव्हे तर शरद युवराज पाटील हा आरोपी सहजपणे जामिनावर मुक्त होईल अशा पद्धतीने दोषारोपपत्र मांडल्याचे निरीक्षण नोंदवले जात असल्याची चर्चा आहे. कारण त्याच्यावर वेळोवेळी निघालेले न्यायालयीन समन्स व वॉरंटही पोलीसांकडून वेळेत बजावले जात नसल्याची बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल ते निर्दोष मुक्तता झाल्यावर सरकार तर्फे अपिलीय होणार नाही याची दक्षता घेतली जाते
या पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी या गोळीबार प्रकरणी सखोल चौकशी विशेष तपास पथक (SIT) किंवा सीआयडीमार्फत करावी. यातून कोणतेही मोठे गुन्हेगारी जाळे कार्यरत असल्यास ते उघडकीस येईल आणि भविष्यातील धोके टाळता येतील. विशेषबाब म्हणजे शरद युवराज पाटील सह काही आरोपी मुंबईच्या गोरेगावमधील दिंडोशी पो स्टे मधील गंभीर गुन्ह्यांमध्येही संशयित आहेत, याची चौकशी युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे. बीड प्रमाणे पाचोऱ्यात देखील या गुन्हेगारांचे प्रति वाल्मीक कराड यासारखे गुन्ह्यांचे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज सध्या तीव्रतेने जाणवते.
या प्रकरणात संलग्न असलेल्यांची गुन्हेगारी व अवैध धंद्यांची पार्श्वभूमी, त्यांचे स्थानीक पोलीस प्रशासनावर आर्थिक किंवा प्रशासकीय संबंध, पोलिसांवर असलेला प्रभाव, अशा बाबींची सखोल तपासणी केल्यासच सत्य बाहेर येऊ शकेल. काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. पोलिस व न्यायव्यवस्थेने यावर स्वखर्चाने आणि स्वतंत्रपणे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
गावठी कट्टे व रिवाल्वर या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व सभांमध्ये या विषयावर वेळो – वेळी चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे नुकत्याच पावसाळी अधिवेशनात आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही या प्रकारांवर लक्ष वेधले होते. मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नसल्याने प्रश्न उभा राहतो – नेमके पाणी कुठे मुरते आहे? यावर चक्क सत्ताधारी आमदारही आवाज उठवत असताना राज्य यंत्रणेची प्रतिक्रिया का संथ आहे, असा सवाल उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी केंद्र व राज्य सरकारकडे निवेदने व पुरावे सादर करत यावर तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बीड प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सारख्या पाचोर्यात देखील प्रति वाल्मीक कराड याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला व त्याच्या आश्र्याखाली असलेल्या गुंडांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, विशेष तपास व अवैध शस्त्रांचा शोध घेणारे मिशन लवकरात लवकर सुरू होणे काळाची गरज आहे. अन्यथा पाचोऱ्यात खुलेआम रक्तपाताच्या घटनांची मालिका सुरूच राहणार आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.