आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर लोकांचा वाढता विश्वास – त्यांचं थांबणं आता अशक्य!

0

Loading

पाचोरा : राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल घडताना दिसत आहेत. शिंदे गटात म्हणजेच शिंदे शिवसेनेमध्ये अनेक ठिकाणी नवीन चेहरे, कार्यकर्ते, नेते यांचा सतत प्रवेश सुरू आहे. पण पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात हा प्रवेशाचा प्रवास एकाच नावाभोवती फिरताना स्पष्ट दिसतो – ते नाव म्हणजे आमदार किशोरआप्पा पाटील! जनतेच्या मनावर गारूड करणारा, विश्वास निर्माण करणारा, प्रत्येक अडचणीत धावून जाणारा, राजकारणात असूनही सेवाभाव जपणारा असा हा नेता. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोक शिंदे शिवसेनेत सामील होत आहेत आणि या प्रवाहात आता एक वेगळीच लाट निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, असे प्रमूख व्यक्ती की ज्यांनी आतापर्यंत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला नाही, त्यांना शोधायलाही भिंग लावावे लागेल. हे घडण्यामागे कारण एकच आहे – लोकांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यावर असलेला प्रगाढ विश्वास. किशोरआप्पा पाटील हे नाव लोकांसाठी केवळ आमदार या पदापुरते मर्यादित राहिलेलं नाही. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट मनोमन पटते – या माणसाजवळ गेलं की आपण रिकाम्या हाताने परत येत नाही. ते कितीही कामात व्यस्त असले तरी एखादं काम समोर आलं की लगेच त्याकडे लक्ष घालतात. आणि एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय माघार घेत नाहीत. आपला माणूस कोणत्याही पक्षाचा असो, कुटुंबाचा असो की विरोधकाचा – त्याला मदत करण्यासाठी किशोरआप्पा पाटील नेहमी तत्पर असतात. त्यांच्या कार्यालयात किंवा घरी कोणी आले की तो निराश परत जात नाही. त्यांची विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे मुंबई येथून असो की रात्री उशिरापर्यंत मतदार संघात दौरे करून घरी पोहोचले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा लोकांच्या ( OPD ) भेटी सुरू होतात. एखादा आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन चौकशी करणे, गरज पडल्यास आर्थिक मदत करणे, कोणाचा रस्ता अडलेला असेल तर त्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, पाण्याच्या नळाची लाईन सुरू करण्यासाठी तगादा लावणे, कोणाचं बँकेचं कर्ज अडलेलं असेल तर ते सोडवून देणे – अशा  एक ना अनेक शेकडो कामांचा अनुभव लोकांनी घेतलाय. त्यामुळेच लोक म्हणतात, “किशोरआप्पा पाटील यांच्याकडे गेलं की प्रश्न सुटतोच.” फक्त किशोरआप्पा नव्हे तर त्यांचा मुलगा सुमित पाटील देखील सक्रिय राजकारणात व समाजकार्यात उतरताना दिसतोय. किंबहुना तो वडिलांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करतो.असे म्हणण्यास हरकत नाही त्याच्या वागण्यात साधेपणा आहे, सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नाही, सत्तेचा वडिलांच्या आमदारकीचा गर्व नाही, दिखाऊपणा नाही. तो शांत, नम्र आणि सगळ्यांना आपल्यासारखं वागवतो. त्यामुळे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तो लवकर प्रिय झाला आहे. सुमित पाटील यांनी देखील लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचं काम सुरू केलं आहे. लोकांच्या अडचणी ऐकून लगेच उपाय शोधण्यासाठी तो रात्रंदिवस फिरत असतो.स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्यापासून या घराण्याची खरी ओळख म्हणजे – “राजकारण हे नाव मिळवण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा करण्यासाठी आहे.” किशोरआप्पा पाटील आणि त्यांचं कुटुंब ही विचारसरणी पाळतं. त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. एखाद्याची बदली अपेक्षित ठिकाणी होण्यासाठी मदत केली, एखाद्याला नोकरी मिळवून दिली, एखाद्याच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे सरसावले, एखाद्याच्या आजारपणात आधार दिला, गावोगावी पाणी-रस्ते अशा मुलभूत सुविधा मिळवून दिल्या – ही यादी अंतहीन आहे. तरीही एक प्रश्न अधूनमधून त्यांच्या मनाला चटका लावतो – ज्यांना त्यांनी मदत केली, ते योग्य वेळी त्यांच्या सोबत राहतात का? कारण समाजात हल्ली एक विचित्र प्रवृत्ती वाढताना दिसतेय – लोकांना गरज असते तेव्हा मदत मागतात, पण त्याच माणसाला मदतीची गरज भासली तर ते पाठमोरे होतात. “माझं काम झालं, आता मला काय घ्यायचं त्याच्याशी” – अशी मानसिकता समाजात वाढतेय. पण हे विसरणं लोकांच्या माणुसकीला शोभणारं नाही. ज्याने आपल्यासाठी वेळ, पैसा, मेहनत दिली, त्याची आठवण ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लोकांची कामं केली आहेत. त्यांच्या कुटुंबाने प्रत्येक संकटात लोकांच्या पाठीशी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पण निवडणुकीच्या काळात लोकांनी त्यांना साथ दिली नाही, तर हे सारे प्रयत्न व्यर्थ ठरतील. निवडणुका म्हणजे फक्त मतांचा खेळ नाही, तर ती खरी कसोटी असते – कोण आपला आहे, कोण फक्त बोलतो, आणि कोण प्रत्यक्षात उभा राहतो. त्यामुळे ज्यांनी त्यांच्या मदतीचा अनुभव घेतला आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी आता त्यांच्या सोबत बिना पैशाने व विना स्वार्थाने . उभं राहावं. याउलट समाजात काही लोक फक्त घेतात पण परत कधीच देत नाहीत. अशा लोकांमुळे समाज घडत नाही, तो मोडतो. म्हणूनच ही वेळ लोकांनी विचार करण्याची आहे – जे आपल्या मदतीला धावून आले, त्यांच्यासोबत आपण कितपत उभं आहोत? जे काम करतात, संकटात आधार देतात, त्यांचं नाव निवडणुकीत पुढे यावं हीच खरी न्यायाची गोष्ट आहे. कारण जेव्हा काम करणाऱ्याला पाठबळ मिळत नाही, तेव्हा समाजासाठी झटण्याची उमेद पुढे कोणत्याही नेत्याला राहणार नाही. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात एक वेगळीच राजकीय समीकरणं तयार झाली आहेत. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या भगिनी स्वर्गीय तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या कन्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी या आज उबाठा शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय रंगमंच आणखीनच रंगतदार बनला आहे. पाचोरा-भडगाव भाजपामध्ये आता माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,नानासाहेब संजय वाघ, सौ. वैशालीताई सूर्यवंशी, सतीशबापू शिंदे, अमोलभाऊ शिंदे अशी मातब्बर मंडळी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आमदार किशोरआप्पा पाटील एकटे उभे आहेत. वरवर पाहता दोन्ही बाजूंच्या ताकदीत तफावत दिसते. केंद्रापासून ते राज्यापर्यंत भाजप-शिंदे शिवसेना युती असली तरी स्थानिक स्तरावर आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत मिळत आहेत. मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होऊनही पक्षाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही. नेत्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे परंतु पक्षाचे अद्यापही पाचोरा शहरात स्वंतंत्र मध्यवर्ती कार्यालय नाही यामागे कारण आहे – वरतून पक्ष संघटन व जनसंपर्क दौऱ्यांकरता आर्थिक रसद मिळालेली नाही. विद्यमान मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पाचोरा – भडगाव पक्ष संघटनेकडे व नेत्यांच्या एकजुटीसाठी पुरेसे लक्ष व वेळ दिलेला नाही स्थानिक भाजपने प्रसारमाध्यमांवर पाहिजे तसा भर दिलेला नाही त्यामुळे पाचोरा-भडगाव भाजपने संघटन आणि जनसंपर्कचा स्पीड अजून पकडलेला नाही. अशा परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कोण वरचढ ठरेल हे काळ आणि वेळच ठरवेल. सध्याच्या राजकीय वातावरणात मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे – लोकांचा विश्वास आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे, सेवाभावामुळे आणि लोकांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांचं थांबणं व त्यांना थांबवणे आता अशक्य झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here