पाचोरा – शेतकरी अनुदान घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे “पैसे वसूल करून घ्या आणि गुन्हे दाखल करू नका” अशीही चर्चा समजले असली तरी कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या आरोपी पर्यंत आणि त्यांना अटक होई पर्यंत थांबणे नाही ज्या -ज्या हरामखोरांनी माय- बाप शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा स्वतःच्या बापाचा माल समजून लुटला अशांना या प्रकरणातील जबाबदार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये, सर्वांना तातडीने अटक व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याची रणनीती आखली जात आहे. या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी आर्थिक मदतीशिवाय फक्त शारीरिक सहकार्य करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना व हितचिंतकांना विशेषतः विविध राजकीय पक्षाचे मान्यवर नेते व पदाधिकारी यांनी संदीप महाजन (मो. 7385108510) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणी प्राथमिक तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील शेतकरी असून, हे शेतकरी नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील असल्याने या प्रकरणाला गांभीर्य आले आहे. ना गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्ती डॉ. सागरदादा गरुड यांनी हि बाब त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर, ना.गिरीशभाऊ महाजन व आमदार किशोरआप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. या सूचनांमुळे चौकशीला गती मिळाली असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यापासून ते प्रत्यक्ष अनुदान मिळवून देण्यापर्यंत तसेच महाजन यांचे उपोषण सोडविण्यापर्यंत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. आंदोलक पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही निर्दोषावर अन्याय होणार नाही तसेच कोणाचीही आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक लूट होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होऊन नंतर परत घेण्यात आले आहेत. अशा खातेधारकांना पोलिसांकडून नोटिसा मिळत आहेत किंवा मिळणार आहेत. या शेतकऱ्यांनी भीती न बाळगता पुढे यावे व आमदार किशोर आप्पा पाटील व जे पण सर्वपक्षीय नेते एकत्र येतील त्यांच्या उपस्थितीत संदीप महाजन यांच्यासमवेत विधीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो कायदेशीर मार्ग काढण्यात येईल कोणत्याही शासकीय, राजकीय किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार होणार नाही मात्र कोणत्याही भामट्याच्या त्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही महाजन यांनी केले. काही व्यक्ती नोटीस प्रकरणातून नाव वगळून देण्याच्या आमिषाने पैसे मागण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले असून अशा फसवणूक करणाऱ्यांची माहिती तातडीने महाजन यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घोटाळ्यात काही CSC सेंटर चालकांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या केंद्रांना तातडीने सिल करून त्यांची तपासणी करावी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये व संगणकामध्ये छेडछाड आढल्यास व दोषी आढळल्यास त्यांना अटक करावी अशी मागणी महाजन यांनी केली आहे. कारण या केंद्रांमार्फतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकून नंतर ते काढण्याचा प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा लढा हा शेतकऱ्यांचा असून शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत तो सुरू राहील, आंदोलन लोकशाही मार्गाने होईल पण परिस्थितीनुसार तीव्रता वाढवली जाईल असे महाजन यांनी स्पष्ट केले. ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी एकत्र येऊन आपली हकीकत मांडावी आणि आम्ही कायदेशीर लढाई लढू असेही त्यांनी सांगितले. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून स्पेशली वरिष्ठ स्तरावरून युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे जर आरोपींना जामीन मिळाला तर तपासावर परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपींना तातडीने अटक व्हावी हीच सर्वांची मागणी आहे.आणि शेतकरी बांधवांना विनंती या आरोपींना जो – जो पाठीशी घालत असेल व प्रयत्न करत असेल त्यांची देखील चौका चौकात चर्चा करून अशांना समाजा समोर उघडे पाडणे गरजेचे आहे पुनश्च संदीप महाजन यांनी नम्र आवाहन केले आहे आंदोलन सुरू असून आणि राहील शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत व अनुदान परत मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असे महाजन यांनी ठामपणे सांगितले. जळगाव जिल्ह्यात तसेच पाचोरा तालुक्यात तीव्र संतापाचे वातावरण असून शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. गिरीशभाऊ महाजन, डॉ. सागरदादा गरुड व आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष न्याय मिळण्यासाठी दोषींना अटक होणे आणि शेतकऱ्यांचे पैसे परत मिळणे अत्यावश्यक आहे.विशेष म्हणजे हा प्रश्न शेतकरी बांधवांचा आहे आणि सध्या पाचोरा – विधानसभा स्तरावर महायुती आघाडी व त्याचे घटक पक्ष सध्या तरी एकत्रित आहेत आणि हा प्रकार महायुती आघाडीच्या काळात घडलेला असल्यामुळे स्थानिक पातळीवरील सर्व महायुती आघाडीचे नेते व पदाधिकारी त्यांनी एकत्रित येतात की नाही व या प्रकरणी सामूहिक काय भूमिका घेतात हे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरी अनुदान आंदोलनाची रणनितीच्या पुढील टप्प्याकडे लागले असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.