![]()
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लाडके जननेते हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा एक वेगळा, अभिनव आणि सर्वार्थाने अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. देशसेवेच्या स्वप्नांनी उजळलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना UPSC व MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. करिअर घडवण्याच्या या ध्येयाने प्रेरित होऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत पाचोरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. पाचोरा येथील बहुउद्देशीय संस्था आणि द युनिक अकॅडमी शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना मोफत व खुल्या प्रकारची सामान्य ज्ञान स्पर्धा रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्यापारी भवन, पाचोरा येथे घेण्यात येणार आहे. ग्रामीण

विद्यार्थ्यांच्या ज्ञानपिपासेला उत्तेजन देत त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील आत्मविश्वासात भर घालणे हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
आज-काल अनेक ठिकाणी वाढदिवस म्हटले की डीजे, मोठमोठे बॅनर, महागडे केक कापणे, चेहऱ्यावर केक चोपडणे, अशा फुशारक्या दिसतात. समाजजीवन, शिक्षण किंवा सार्वजनिक हिताच्या नावाने काहीही साध्य न होता उलट पैशांची उधळपट्टी दिसते. या पार्श्वभूमीवर हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी समाजाभिमुख, करिअर केंद्री उपक्रमांचा मार्ग निवडून युवा विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त मुलांच्या भविष्य विकासासाठी घेतलेला हा उपक्रम जनतेत प्रचंड उत्साह निर्माण करणारा ठरत आहे. माध्यमांवर या बातम्या झळाल्यानंतर जनमानसातही सकारात्मक चर्चा सुरू असून समाजात शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हेतू यशस्वी होताना दिसत आहे.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे परीक्षा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सन्मान व बक्षीस वितरण समारंभ देखील होणार आहे. MPSC आणि UPSC या परीक्षा प्रत्यक्ष ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येतील. विद्यार्थ्यांनी एक तास आधी म्हणजे सकाळी 10 वाजता केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असेल. परीक्षा 11 वाजता वेळेवर सुरुवात होऊन 1 तासांची असणार आहे. परीक्षेच्या दरम्यान मोबाईलचा वापर पूर्णतः बंदी असेल. एकूण 100 प्रश्न विचारले जाणार असून त्यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षांमध्ये या सर्व विषयांचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा प्रमुख उद्देश आयोजकांचा आहे.
या परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य राखण्यात आले आहे. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल त्यांना परीक्षेत बसता येणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन फॉर्म भरून सहभाग निश्चित करावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 34 वर्ष ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांनी पॅड, पेन व कोरा कागद सोबत आणणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे स्वप्न पाहतात. परंतु चांगल्या मार्गदर्शनाचा अभाव, आर्थिक अडचणी, संसाधनांची कमतरता या कारणांमुळे अनेकांची स्वप्ने हरवतात. या पार्श्वभूमीवर मोफत व दर्जेदार मार्गदर्शनाची ही सुवर्णसंधी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात महत्त्वाची ताकद देणारी ठरणार आहे.
हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांचा वाढदिवस केवळ औपचारिक राहू नये तर समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यासाठी तो उपयुक्त ठरावा, असा विचार या उपक्रमातून दिसून येतो. विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरकडे नेण्यासाठी त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती वाढवणे, त्यांची प्रतिभा ओळखून योग्य प्रेरणा देणे हे सामाजिक बांधिलकीचे कार्य यातून प्रकट झाले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील अनेक गुणी विद्यार्थी दूरवरच्या शहरात जाऊन मार्गदर्शन घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत परीक्षा थेट त्यांच्या गावाजवळ उपलब्ध होणे ही मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशाचा पाया अधिक भक्कम होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागात करिअरदृष्टी जागृती निर्माण करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही या उपक्रमाचा लाभ होणार आहे. कारण मुलांनी स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहावे, शैक्षणिक विकासासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पालकांचीदेखील भूमिका महत्त्वाची असते. समाजात अनेक वेळा राजकारण आणि राजकीय नेत्यांविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होण्याची शक्यता असते. मात्र हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर समाजात सकारात्मक बदल घडवणे हा संदेश या निमित्ताने दिला आहे.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व विद्यार्थ्यांना हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे की या स्पर्धेचा अधिकाधिक विद्यार्थी लाभ घ्यावा. भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धिगुणांकात वाढ होईल, आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्याचा मार्ग सुकर होईल. ऑनलाईन नोंदणी लिंकला भेट देऊन त्वरित आपले नाव नोंदवावे असा संदेश देखील देण्यात आला आहे. एका विधायक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची ही नवी पायवाट समाजात शिक्षणाचा प्रकाश वाढवत अधिक उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग दाखवणारी ठरत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







