![]()
पाचोरा – शहरातील छत्रपती संभाजी राजे चौक आता संध्याकाळी जणू खवय्यांची दरबार भरल्यासारखा दिसतो. भुयारी पुलापासून तर कॉलेज चौकापर्यंत हा रस्ता ‘खाऊगल्ली’ म्हणूनच ओळखू लागला आहे. आणि याच खाऊगल्लीत गेल्या पंधरा दिवसांपासून एक स्टॉल जोरदार लोकप्रिय होत आहे. नाव ऐकताच भूक वाढवणारं – “मुंबईचा वडापाव”! पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील शेखर पाटील आणि गाळण गावातील अमोल गायकवाड Mo. 7420888878 दोन तरुणांनी स्वतःची नोकरी सांभाळत रोज संध्याकाळी चार वाजल्यापासून हा वडापावचा स्टॉल सुरू केला. दिवसभराच्या कामानंतर त्यांनी मेहनत करून वेगळं काहीतरी करायचं ठरवलं आणि थेट मुंबईत मिळणारी अस्सल चव पाचोर्यात आणली. त्यांची ही धडपड आता खवय्यांच्या जिभेला इतकी भावली आहे की रोज संध्याकाळी या ठिकाणी जबरदस्त खवय्यांची रांग दिसते. या स्टॉलची खासियत म्हणजे इथली चव आणि स्वच्छता. इथे वडे आधी तयार करून ठेवले जात नाहीत. ग्राहकांच्या नजरेसमोरच ताजेतवाने वडे बनवले जातात. तीन चटकदार चटण्या, चांगल्या दर्जाचे तेल, मसाल्याची खास चव आणि स्वच्छतेला पूर्ण महत्त्व… त्यामुळे प्रत्येक घासाला ‘अस्सल मुंबईची झणझणीत चव’ मिळते. त्यामुळे एक वडा खाल्ला की ग्राहक दोन-तीन वडा पाव हमखास खाऊन जातो. विशेष म्हणजे इथे फक्त खाणारेच नाही तर पार्सलचाही धडाका असतो. रोज सहजपणे पन्नास ते शंभर वड्यांचे पार्सल नेले जाताना दिसतात. काहीजण स्वतः खाऊन मग घरीही वडापाव घेऊनच निघतात. एवढी गर्दी असल्यामुळे इथे वडा मिळण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनिटे थांबावं लागतं. पण एवढं थांबल्यानंतर मिळणारी चव खवय्यांना इतकी आवडते की लोक प्रतिक्षा करूनही आनंदाने वडापाव खातानाच दिसतात. गर्दीत उभे असलेले लोक वडापावची चव, स्वच्छता आणि मुंबईसारखी झणझणीत चटणी याचं सतत कौतुक करताना ऐकू येतात. अनेक जण आपापल्या मित्रांना फोन करून “चल रे मुंबईचा वडापाव खायला” असं म्हणत त्यांना बोलावतात. काहींच्या चर्चेत तर पुढच्या वीकेंडला घरच्यांना घेऊन येण्याचाही प्लॅन ऐकू येतो. या ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीसोबत हा व्यवसाय सुरू करून दाखवल्यामुळे अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यांची मेहनत, चिकाटी आणि चव यामुळे हा छोटासा स्टॉल आता पाचोर्यात चर्चेचा विषय बनला आहे. साधा वाटणारा वडा पाव आज त्यांच्या हातात ‘ब्रँड’ झाला आहे, आणि याच चवीमुळे ओळखही. सध्या मुंबईचा वडापाव हा पाचोर्यातील अनेक खवय्यांच्या संध्याकाळी ठरलेला ‘स्पेशल ब्रेक’ बनला आहे. जिभेला चव, डोळ्यासमोर स्वच्छता आणि खिशाला परवडणारी किंमत… एवढं सगळं एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे लोकांची गर्दी वाढतच चालली आहे. एकंदरीत… मुंबईची चव पाचोर्यात आली आणि खवय्यांनी तिला मनापासून दाद दिली!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






