पाचोरा अनुदान घोटाळा:आरोपी कोठडीत; BNSS 48 नुसार नातेवाईकांना सुचना, तपास मोंढाळा मार्गे शिरूडपर्यंत पोहचण्याची शक्यता

0

Loading

पाचोरा – तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्तीतील अनुदान मंजुरी प्रक्रियेमध्ये झालेल्या मोठ्या घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी तत्काळ कारवाई केली असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या पाच आरोपींना पाचोरा न्यायालयाने पोलिस कोठडी तद् नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्य शासन, महसूल विभाग आणि शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या या फसवणुकीत तब्बल 2 कोटी 54 लाख 69 हजार 301 रुपये अनुदानाच्या नावाखाली अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अर्थात सखोल तपासांती तो वाढू देखील शकतो तपासादरम्यान आरोपींनी संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करून खोटे दस्त, पंचनामे, खोटी कागदपत्रे, तसेच अधिकाऱ्यांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून अपात्र व्यक्तींना अनुदान मंजूर करून घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमोल सुरेश भोई (वय 27) तत्कालीन महसूल सहाय्यक, तसेच त्याचा सहयोगी गणेश हेमंत चव्हाण (वय 24) मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी या दोघांनी संगनमताने तहसील कार्यालयात वापरले जाणारे लॉगिन आयडी व पासवर्ड बेकायदेशीररीत्या वापरले. त्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 122 आणि 2024-25 मध्ये 225 अशा एकूण 347 अपात्र व्यक्तींच्या नावाने बनावट अनुदान मंजूर केली. या व्यक्तींच्या नावावर शेती नसतानाही, त्यांच्याकडे पिकांचे नुकसान दाखवणारी कागदपत्रे नसतानाही बनावट पंचनामे सादर करण्यात आले, खोट्या शासकीय सह्या करण्यात आल्या आणि त्याच आधारावर निधी मंजूर करण्यात आला. या संपूर्ण रकमांची उचल त्यांनी संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा करून त्यानंतर स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईपूर्वी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने अटक प्रक्रियेबाबत सांगितलेल्या सर्व नियमांचे अचूक पालन केले आहे. आरोपींना अटक करताना BNSS कलम 47 नुसार अटकेची माहिती देण्यात आली असून BNSS कलम 48 नुसार त्यांच्या नातेवाईकांना लिखित सुचनापत्र देण्यात आले आहे. या सुचनापत्रांमध्ये अटकेची माहिती तसेच अटकेची कारणे नमूद करण्यात आली आहेत. या नातेवाईकांमध्ये गणेश पांडुरंग मराठे (वय 45) नेहरु नगर, जळगाव; गजानन चिंतामण पाटील (वय 49) सारोळा खुर्द, ता. पाचोरा; आणि यश राजेंद्र तिवारी (वय 22) वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव यांचा समावेश आहे. आरोपींना अटक करताना BNSS कलम 47 नुसार अटकेची माहिती देण्यात आली असून BNSS कलम 48 नुसार त्यांच्या नातेवाईकांना लिखित सुचनापत्र देण्यात आले आहे. ते आरोपींचे खरोखर रक्ताच्या नात्यातले जवळचे नातेवाईक आहेत का ? की आणखी काही वेगळे संबंध या प्रकरणी त्यांचा आहे याबाबतही उलट तपासणी महत्त्वाची आहे आरोपींच्या अटकपूर्व वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे पूर्ण करण्यात आली असून, तपास अधिकारी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये हेमंत ज्ञानदेव चव्हाण (वय 45, कृष्णापुरी पाचोरा), विजय दत्तात्रय पाटील (वय 43, रा. सारोळा खुर्द), आणि हर्षल संजय सपकाळे (वय 22, रा. वडगाव आंबे) यांचा समावेश आहे. या आरोपींनी आर्थिक गैरव्यवहारात सहाय्य केले, अनुदानाची रक्कम काढून दिली, तसेच काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या इलेक्ट्रॉनिक कागदपत्रांची मॅनिपुलेशन केली असल्याचे तपासात दिसून आले आहे. या घोटाळ्याचा तपास आता अधिक व्यापक बनत असून मोंढाळा मार्गे थेट शिरूड पावेतो तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात फक्त थेट आरोपी नाहीत, तर त्यांना आर्थिक, तांत्रिक किंवा अधिकृत पातळीवर मदत करणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेणे आवश्यक आहे. यासाठी आरोपींच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) ची तपासणी होणे आवश्यक आहे आरोपींच्या संपर्कात नेमके कोण-कोण होते, कोणी त्यांना माहिती, मदत किंवा मार्गदर्शन केले का, कोणी प्रशासकीय पातळीवर भूमिका बजावली का, याचा महत्त्वपूर्ण तपास होणे आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. यात 1 TB क्षमतेची Western Digital हार्डडिस्क, 256 GB ADATA SSD, तसेच आरोपींच्या वापरातील VIVO, IQOO तसेच इतर अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल फोनचा समावेश आहे. जप्त केलेल्या मोबाईल आणि संगणकीय उपकरणांमध्ये खोट्या नामावल्या, बनावट 7/12 उतारे, इलेक्ट्रॉनिक दस्त, लॉगिन डेटा, तसेच बँकांत केलेल्या आर्थिक व्यवहारांचा पुरावा मिळू शकतो, तर आरोपींच्या पासवर्ड, प्रवेशाधिकार, इलेक्ट्रॉनिक पुरावे शोध महत्वाचा आहे आरोपींनी अपहार केलेल्या रकमेतील नेमकी किती रक्कम कोणाकडे गेली, कुठल्या खात्यात वळवली, किती रक्कम आरोपींकडे रोख स्वरूपात आली तसेच दोषी व्यक्तींना मदत केलेल्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा व नातेवाईक यांचा सहभाग असल्याचा संशय तर्कसंगत आहे या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून शासनाचा निधी लुटण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांवर ,कर्मचारी,नातेवाई, मित्र मंडळी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाचोरा तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या जाळ्याचे मूळ उघड करणारा हा मोठा तपास असून, सरकारने व महसूल प्रशासनाने गंभीर गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजातूनही होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here