![]()
महाराष्ट्रातील अलीकडील नगरपालिका निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेले हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील हे सध्या पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे किशोरआप्पा पाटील यांनी पाचोरा–भडगावसह परिसरातील नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेचा झेंडा उंचावत निर्णायक भूमिका बजावली. या विजयामुळे केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर राज्यपातळीवरील सत्ताकेंद्रातही त्यांच्या नेतृत्वाची दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर किशोरआप्पा पाटील यांना तातडीने काही तासांतच वरिष्ठ नेत्यांकडून बोलावणे आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासात किशोरआप्पा पाटील यांच्या भोवती घडणाऱ्या हालचालींनी वेग घेतला आहे. पाचोरा आणि भडगाव या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिंदे शिवसेनेला मिळालेले एकतर्फी वर्चस्व हे केवळ आकड्यांचे यश नसून संघटनात्मक ताकद, काटेकोर नियोजन, योग्य उमेदवारांची निवड आणि जनतेशी असलेला थेट संवाद यांचा परिणाम मानला जात आहे. या विजयामागे किशोरआप्पा पाटील यांची नेतृत्वशैली, कार्यकर्त्यांवरील पकड आणि विकासकेंद्रित राजकारण महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळेच या यशाची दखल थेट पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली जात असून लवकरच आणखी एक मोठे स्वप्न साकार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेचा नवा चेहरा उभा राहत असताना किशोरआप्पा पाटील हे त्या नेतृत्वाचे विश्वासू आणि प्रभावी शिलेदार म्हणून पुढे येत आहेत. मानसपुत्र ही ओळख केवळ भावनिक नसून ती राजकीय विश्वास, जबाबदारी आणि सातत्यपूर्ण कामगिरीवर आधारित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर किशोरआप्पा पाटील यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. वरिष्ठांकडून आलेले तातडीचे बोलावणे हे याच दिशेने जाणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या संपूर्ण घडामोडीत आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात लवकरच या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असून त्या दृष्टीने शिंदे शिवसेना संघटनात्मक तयारीला लागल्याचे चित्र आहे. नगरपालिका निवडणुकांतील यश हा केवळ प्रारंभ असून खरी कसोटी आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांमध्ये असणार आहे, हे पक्ष नेतृत्वाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती आखण्याची जबाबदारी किशोरआप्पा पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि विजयी नेत्यांकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हॅट्रिक आमदार म्हणून किशोरआप्पा पाटील यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत तर मतदारांचा विश्वासही सातत्याने टिकवून ठेवला आहे. विकासकामे, जनतेच्या प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद, स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणे आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर दिलेला भर यामुळेच त्यांची प्रतिमा एका आक्रमक पण संयमी नेत्याची तयार झाली आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधकांना दणका देत त्यांनी दंड ठोठावत विजय मिळवला असेच चित्र या निकालातून दिसून आले असून हा अनुभव आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. पाचोरा–भडगावच्या निकालानंतर राज्यातील इतर भागांतील शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून हा विजय संपूर्ण संघटनेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी हा निकाल कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर व्यापक रणनीती आखली जात असून त्या रणनीतीत किशोरआप्पा पाटील यांची भूमिका अधिक निर्णायक आणि व्यापक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार आगामी काळात किशोरआप्पा पाटील यांच्याकडे केवळ स्थानिक पातळीवरील नव्हे तर राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली जाऊ शकते. संघटनात्मक बांधणी, निवडणूक व्यवस्थापन किंवा आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी समन्वयकाची महत्त्वाची भूमिका त्यांच्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विश्वासू आणि कार्यक्षम नेत्यांना पुढे आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यात किशोरआप्पा पाटील हे अग्रक्रमावर असतील अशीच चर्चा आहे. एकूणच महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी अभिमन्यू ठरलेले किशोरआप्पा पाटील हे सध्या नव्या राजकीय टप्प्यावर उभे असून वरिष्ठांकडून आलेले तातडीचे बोलावणे, वाढत्या जबाबदाऱ्यांच्या चर्चा आणि आगामी महापालिका व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेचे वाढते महत्त्व यामुळे लवकरच त्यांच्या राजकीय प्रवासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





