![]()
पाचोरा – निसर्गाच्या कुशीत, मातीच्या सुगंधात आणि ग्रामीण संस्कृतीच्या आत्मीयतेत रमण्याची संधी देणारा एक नवा अनुभव पाचोरा तालुक्यात साकार होत असून ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव, पारंपरिक चवीचे भोजन, शांत व प्रसन्न वातावरण आणि कुटुंबीय व मित्रांसोबत आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’ या नव्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख जपणारे हे कृषी पर्यटन केंद्र केवळ पर्यटन स्थळ न राहता शहरातील धकाधकीच्या जीवनातून काही काळ दूर जाऊन निसर्गाशी नाते जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. येथे शेतीचा प्रत्यक्ष अनुभव, शिवार फेरी, ग्रामीण खेळ, जनावरांशी जवळून संवाद, तसेच पारंपरिक वातावरणात विरंगुळा घालवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंद देणाऱ्या विविध उपक्रमांची विशेष आखणी करण्यात आली आहे. या कृषी पर्यटन केंद्रात स्विमिंग पूल, स्पेशल म्युझिकल रेन डान्स, घोडेस्वारी, घोडागाडी व बैलगाडीची शिवार फेरी, ट्रॅक्टर ट्रेन अशा आकर्षक सुविधा असून लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची जागा, मुलांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच एडव्हेंचर प्रकारातील दोरीवरील खेळ, निसर्गरम्य परिसरात पिकनिक स्पॉट, कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध असल्याने येथे येणाऱ्यांना एक वेगळाच आनंददायी अनुभव मिळणार आहे. शाळा व महाविद्यालयांच्या सहली, निसर्ग भ्रमंती, वाढदिवस समारंभ, गेट-टुगेदर, कौटुंबिक मेळावे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे कृषी पर्यटन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रशस्त वाहनतळाची सुविधा असल्याने कुटुंबासह किंवा मोठ्या समूहाने येणाऱ्यांसाठीही कोणतीही अडचण राहणार नाही. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत ग्रामीण जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी हे केंद्र एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’चा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला असून या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती लाभावी, अशी आयोजकांची मनापासून इच्छा आहे. आपली उपस्थिती म्हणजेच या नव्या उपक्रमाला मिळणारे खरे बळ व प्रेरणा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे कृषी पर्यटन केंद्र वाडी शेवाळे-शिंदाड रोड, शिंदाड, ता. पाचोरा, जिल्हा जळगाव येथे असून अधिक माहितीसाठी 9423162365 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निसर्ग, शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी कुटुंबासह ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्रा’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





