जळगावचे दोन भाऊ : पक्षनिष्ठेच्या कसोटीवर राज्यात वरचढ ठरलेले नेतृत्व

0

Loading

जळगाव – जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे प्रभाव टाकणारी, पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने थेट राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी पोहोचलेली दोन नावे म्हणजे भाजपचे संकटमोचक समजले जाणारे आणि शिंदे शिवसेनेचे साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्त्यांशी जवळीक आणि थेट हस्तक्षेप करणारा “लोकांचा मंत्री” म्हणून ओळखले जाणारे . राजकीय पक्ष वेगळे असले तरी नेतृत्वाची शैली, पक्षनिष्ठा आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत दाखवलेली जिद्द यामुळे हे दोघेही भाऊ जळगावपुरते मर्यादित न राहता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात चमकले आहेत. महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नसून ती पक्षांची संघटन क्षमता, नेतृत्वाची ताकद आणि कार्यकर्त्यांची निष्ठा यांची खरी परीक्षा असते आणि जळगाव महापालिका

निवडणुकीत ही परीक्षा अधिक कठीण ठरली. अंतर्गत नाराजी, बाह्य विरोधकांची आक्रमक टीका, सतत बदलणारी राजकीय समीकरणे आणि सत्तासंघर्ष यामुळे वातावरण तापलेले असताना गेल्या दोन महिन्यांपासून गिरीषभाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोघेही भाऊ अंतर्गत व बाह्य विरोधकांच्या टीकेच्या तोंडी होते; कुणी संघटनात्मक निर्णयांवर बोट ठेवले, कुणी उमेदवार निवडीवर प्रश्न उपस्थित केले, तर कुणी थेट नेतृत्वक्षमतेवरच शंका घेतली, मात्र निकालांनीच अखेर सत्य स्पष्ट केले. भाजपमध्ये गिरीषभाऊ महाजन यांची ओळख संकटमोचक अशीच असून पक्ष अडचणीत असो, संघटन विस्कळीत झालेले असो किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असो, तेथे ते सक्रिय होतात असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे; जळगाव महापालिका निवडणुकीतही उमेदवारांची मांडणी, बूथनिहाय रणनीती, नाराज गटांना सांभाळणे आणि आवश्यक तेव्हा कठोर निर्णय घेणे या सगळ्या बाबींमध्ये त्यांनी विलंब न करता निर्णयक्षमता दाखवली आणि काही निर्णयांमुळे जवळच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन नाराजी वाढली तरी पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी टीकेचा स्वीकार केला कारण त्यांच्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा होता. दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे थेट संपर्क ठेवणारे, साध्या भाषेत बोलणारे आणि कामाच्या बाबतीत आक्रमकपणे हस्तक्षेप करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात; “लोकांचा मंत्री” ही उपाधी त्यांना सहज मिळालेली नसून प्रशासकीय अडथळे असोत किंवा कार्यकर्त्यांच्या तक्रारी, ते थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून काम मार्गी लावतात अशी त्यांची प्रतिमा आहे आणि महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेत संघटन मजबूत केले, कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला व विरोधकांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण प्रक्रियेत दोघांनीही वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतले; उमेदवारी नाकारली जाणे, गटनेतृत्व बाजूला सारले जाणे, काही जुने कार्यकर्ते नाराज होणे अशा घटना घडल्या आणि टीकाकारांनी याच मुद्द्यांवरून दोघांनाही लक्ष्य केले, तरी “पक्ष हीच पहिली निष्ठा” हे तत्व त्यांनी जपले.भाजपचे सहा व शिंदे शिवसेनेचे सहा असे एकूण बारा नगरसेवक आधीच बिनविरोध झाले होते निवडणुकीच्या रणधुमाळीत असे वाटत होते की भाजप व शिंदे शिवसेनेला निवडक जागा मिळतील मात्र निकालांच्या दिवशी चित्र बदलले आणि दिल्लीपासून ते महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळापर्यंत तसेच थेट गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत एकच चर्चा सुरू झाली की जळगाव महापालिकेच्या विजयामागे हे दोघेही भाऊ केंद्रबिंदू ठरले; पक्ष वेगळे असले तरी जळगाव जिल्ह्यातील राजकारणात दोघांनीही युती करून आपापल्या पक्षाला वरचढ स्थान मिळवून दिले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या विजयाने स्पष्ट केले की फक्त घोषणाबाजी किंवा प्रचार पुरेसा नसून जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते, बूथपर्यंत पोहोचलेली यंत्रणा आणि संकटात निर्णय घेणारे नेतृत्व आवश्यक असते आणि हेच दोघांनी दाखवून दिल्यामुळे ते आज राज्याच्या राजकारणात प्रभावी चेहरे म्हणून चर्चेत आहेत. “जळगावचे दोन भाऊ” ही संज्ञा केवळ प्रादेशिक अभिमानापुरती न राहता पक्षासाठी स्वतःला झोकून देणे, टीकेला सामोरे जाणे, आवश्यक तेव्हा कठोर भूमिका घेणे आणि निकालानंतर शांतपणे पुढील कामकाजाला लागणे या नेतृत्वशैलीचे प्रतीक बनली आहे; त्यामुळेच महापालिका निवडणुकीचा हा विजय अंतिम टप्पा नसून पुढील राजकीय लढतींची नांदी ठरतो आणि जळगाव जिल्ह्याचे नाव राज्याच्या राजकारणात ठळकपणे पुढे येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here