![]()
पाचोरा – नगरपालिका शिंदे शिवसेनेचे गटनेते तथा प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील हे पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या सतत संपर्कात असणारे, रस्त्यावर उतरून काम करणारे आणि मनमिळाव व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ पदाची जबाबदारी न पार पाडता प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा पाचोरा नगरपालिका हद्दीतील गिरणापंपींग रोड व गोकुळ धाम परिसरातील नागरिकांना अनुभवता आली. या परिसरात गेल्या काही काळापासून स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य होते. यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे अपघातांचा धोका वाढला होता तसेच असामाजिक तत्वांची भीतीही नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत तातडीने स्ट्रीट लाईट बसवाव्यात, अशी ठोस मागणी पाचोरा नगरपालिका गटनेते तथा प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील आणि सौ. दिपाली किशोर भास्कर पाटील यांच्याकडे केली. नागरिकांच्या या मागणीचे गांभीर्य ओळखत सुमित किशोर आप्पा पाटील यांनी कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि प्रशासकीय पातळीवर आवश्यक पाठपुरावा करून कामाला गती दिली. विशेष म्हणजे नागरिकांनी मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम पूर्ण करून देण्यात आले, त्यामुळे परिसरात रात्रीच्या वेळी उजेड पडून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या वेळी बोलताना सुमित किशोर आप्पा पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “मी फक्त प्रभाग क्रमांक नऊचा नगरसेवक आणि पाचोरा नगरपालिका सत्ताधारी गटाचा गटनेताच नाही. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जनतेने हॅट्रिक आमदार म्हणून माझे वडील किशोर आप्पा पाटील यांच्यावर विश्वासाने सोपवली आहे, तर पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद आमच्या मातोश्री सुनिताआई यांच्याकडे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर जनतेचा आणि माता–पित्यांचा ऋण म्हणून मला संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक परिसराच्या विकासासाठी सातत्याने ॲक्शन मोडमध्ये राहणे आवश्यक आहे.” या स्ट्रीट लाईट बसवण्याच्या कामामुळे रस्त्यावर प्रकाश उपलब्ध झाल्याने वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे, पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे तसेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना निर्धास्तपणे हालचाल करता येत आहे. सौ. दिपाली किशोर भास्कर पाटील यांनीही नागरिकांच्या सहकार्यामुळेच विकासकामांना गती मिळत असल्याचे सांगत भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. नादागर सेवकपंपींग रोड व गोकुळ धाम परिसरातील स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम जरी छोटे वाटत असले, तरी त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि जीवनमानावर होणारा असल्याने “मागणी केली आणि लगेच काम झाले,” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





