![]()
पाचोरा – शहर व तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या अंकुर हॉस्पिटल व प्रसूतीगृहाचे नवीन भव्य व अत्याधुनिक वास्तूत स्थलांतर येत्या सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे. महाराणा प्रताप चौक, एम.एम. कॉलेज समोर, पाचोरा येथे होणाऱ्या या स्थलांतर सोहळ्यानिमित्त विविध उद्घाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. नागरिकांना अधिक सुसज्ज, सुरक्षित व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे नवीन हॉस्पिटल कार्यान्वित होत असून, पाचोरा शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये यामुळे मोलाची भर पडणार आहे.
या स्थलांतर व उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आबासो चिमणरावजी रुपचंदजी पाटील (आमदार, पारोळा), डॉ. नरहरी मळगावकर (Progenesis Infertility, नाशिक), डॉ. पंकज सरोदे (स्त्रीरोग तज्ञ, Cradle Maternity Hospital, पुणे) तसेच डॉ. जसित अरगडे (स्त्रीरोग तज्ञ, अरगडे हॉस्पिटल, बाकण) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भुषण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा), बापू रोहोम (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा), विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा), राहुलकुमार पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा पोलीस स्टेशन), मंगेश देवरे (मुख्याधिकारी, नगर परिषद पाचोरा) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, डॉक्टर, सामाजिक व राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात हॉस्पिटलचे मुख्य उद्घाटन आण्णासाहेब डॉ. के. बी. पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील भूषवणार आहेत. ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन अमोलदादा चिमणराव पाटील (आमदार, पाचोरा विधानसभा) यांच्या हस्ते पार पडणार आहे. डॉक्टर केबिनचे उद्घाटन संतोष देवचंद पाटील व शालिनीबाई संतोष पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून अॅडमिनिस्ट्रेशन केबिनचे उद्घाटन वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुसऱ्या डॉक्टर केबिनचे उद्घाटन भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांच्या हस्ते होणार आहे. मेडिकल स्टोअरचे उद्घाटन अमोल पंडीतराव शिंदे यांच्या हस्ते, तर पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन सुनिताताई किशोर पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्षा, पाचोरा नगर परिषद) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
नवीन वास्तूत स्थलांतरित होत असलेल्या अंकुर हॉस्पिटल व प्रसूतीगृहामध्ये रुग्णांसाठी अत्याधुनिक व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुसज्ज व वातानुकूलित ऑपरेशन थिएटर, स्पेशल वातानुकूलित रुग्णकक्ष, डिलक्स रूम, गर्भवती महिलांची नोंदणी व नियमित तपासणी, सुलभ व वेदनारहित प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व गर्भाशय विकारांचे अचूक निदान व उपचार, मूलबाळ न होण्यावरील म्हणजेच वंध्यत्व उपचार, कुटुंबनियोजन सल्ला व साधने, पाळीचे विकार, लैंगिक समस्या यांचे निदान व उपचार या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच २४ तास लिफ्ट व जनरेटरची सुविधा, २४ तास सुरू राहणारी फार्मसी तसेच अद्ययावत पॅथॉलॉजी लॅबची सोय करण्यात आली आहे.
दीर्घकाळ पाचोरा व परिसरातील नागरिकांचा मिळालेला विश्वास, सदिच्छा, आशीर्वाद व सहकार्य याच्या बळावरच अंकुर हॉस्पिटल आज या नव्या टप्प्यावर पोहोचत असल्याची भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या स्थलांतर सोहळ्यानिमित्त तीर्थप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी वैद्यकीय सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांचा संगम असलेले हे हॉस्पिटल भविष्यात पाचोरा तालुक्याच्या आरोग्यसेवेत एक विश्वासार्ह केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





