![]()
पाचोरा – नगरपालिकाच्या नगराध्यक्ष सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, गटनेते सुमित पाटील तसेच नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर परिसरात दीर्घकाळापासून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर प्रभावी तोडगा काढण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण कामाचा केंद्रबिंदू ठरले ते आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे, ज्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्ष उपस्थित राहून या समस्येच्या मुळावर घाव घातला. त्र्यंबक नगरातील तुळजाई शिक्षण पण संस्था शाळेच्या मागील बाजूस पावसाचे पाणी साचून राहत असल्याने परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. पावसाळ्यात थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत पाणी साचत असे, दुर्गंधी पसरत असे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये होती. या परिस्थितीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारी गांभीर्याने घेत आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून समस्येची नेमकी कारणे जाणून घेतली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा, अडथळलेला पाण्याचा प्रवाह आणि काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या नालींच्या दलेलांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. केवळ कागदी सूचना न देता प्रत्यक्ष काम उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रत्यक्ष उपस्थितीमुळे या ठिकाणी साचलेले पाणी पास करण्याचे काम हाती घेण्यात आले, नाल्यांतील गाळ आणि कचरा काढण्यात आला, नालींच्या दलेलांची दुरुस्ती करण्यात आली तसेच आवश्यक त्या ठिकाणी नव्याने नाली काढण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत काम दर्जेदार व्हावे आणि भविष्यात पुन्हा पाणी साचू नये यासाठी सतीशआबा चेडे यांनी प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवले. काम सुरू असताना काही काळ नागरिकांना किरकोळ अडचणी सहन कराव्या लागल्या, मात्र दीर्घकालीन दिलास्यासाठी नागरिकांनी संयम दाखवत सहकार्य केले. सफाई व निचरा काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पाण्याचा निचरा सुरळीत झाला असून रस्ते आणि मोकळ्या जागा कोरड्या राहू लागल्या आहेत. यामुळे दुर्गंधी कमी झाली असून डासांचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे नागरिकांकडूनही बोलले जात आहे. आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांचे आरोग्य आणि मूलभूत सुविधा हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू असून त्र्यंबक नगरातील समस्या ही केवळ गैरसोयीची नसून आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारी होती. त्यामुळे ती तातडीने सोडवणे गरजेचे होते. प्रशासनाचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊन ही समस्या मार्गी लावण्यात आली असून भविष्यातही परिसरातील निचरा व्यवस्था नियमितपणे तपासली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, गटनेते सुमित पाटील आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनामुळे कामाला आवश्यक प्रशासकीय पाठबळ मिळाले, मात्र प्रत्यक्षात काम जमिनीवर उतरवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सतीशआबा चेडे यांच्या पुढाकारामुळे शक्य झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. एकूणच त्र्यंबक नगरातील तुळजाई शिक्षण पण संस्था शाळेच्या मागील भागातील पाणी साचण्याची समस्या निकाली निघाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आरोग्य सभापती तथा हॅट्रिक नगरसेवक सतीशआबा चेडे यांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





