![]()
पाचोरा : शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अविनाश देविदास सुतार यांची पाचोरा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचे जाहीर अभिष्टचिंतन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम भोला अप्पा यांच्या फार्म हाऊस, सारोळा येथे अत्यंत आपुलकीच्या व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभिष्टचिंतन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अभय शरद पाटील होते. कार्यक्रमास ज्येष्ठ वकील ॲड. एस. पी. पाटील, ॲड. एन. आर. बोरसे, ॲड. बापू सैंदाणे, उपाध्यक्ष ॲड. रवींद्र ब्राह्मणे, ॲड. अंकुश कटारे, ॲड. ज्ञानेश्वर लोहार, ॲड. बबलू पठाण, ॲड. एच. डी. माहेश्वरी, ॲड. ललित सुतार, ॲड. नरेंद्र डाकोरकर, ॲड. अमजद पठाण, ॲड. जयराज उबाळे, ॲड. गोपाल पाटील, ॲड. राहुल पाटील, ॲड. रणसिंग राजपूत, ॲड. अनुराग काटकर, ॲड. अनिल पाटील, ॲड. राजू वासवानी, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड. स्वप्निल पाटील, ॲड. संदीप पाटील, ॲड. निलेश सूर्यवंशी, ॲड. चंदन राजपूत, ॲड. एम. के. मोरे, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. अरुण भोई, ॲड. तुषार नैनाव, ॲड. प्रशांत मालखेडे, ॲड. पी. डी. पाटील, ॲड. नाना महाजन, सरकारी वकील नाईकवाडे साहेब यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, आबा पाटील, विकास सूर्यवंशी आदी मान्यवर व असंख्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी ॲड. अविनाश सुतार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात अनेक वकिलांनी ॲड. सुतार यांच्या आजवरच्या व्यावसायिक वाटचालीचा आढावा घेतला. न्यायव्यवस्थेतील त्यांचे योगदान, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक जाणीव ठेवून केलेले कार्य याचा गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात ॲड. अभय शरद पाटील यांनी सांगितले की, नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून ॲड. अविनाश सुतार यांची नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची बाब नसून संपूर्ण वकील बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कायद्याचे ज्ञान, अनुभव आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर ते शहराच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास आहे. यावेळी ॲड. अविनाश सुतार यांनी मनोगत व्यक्त करताना दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन तसेच उपस्थित सर्व वकील मित्रांचे आभार मानले. माझ्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. पाचोरा शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या आणि न्यायसंगत निर्णयांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी सांगितले. वकील म्हणून मिळालेला अनुभव नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितच उपयोगी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भोला अप्पा यांनी आपले फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आपुलकी, स्नेह आणि एकोपा यांचे दर्शन या अभिष्टचिंतन सोहळ्यात घडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी ॲड. अविनाश सुतार यांना पुढील कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. पाचोरा नगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या या उपक्रमामुळे वकील बांधवांमधील ऐक्य आणि सामाजिक सहभाग अधिक दृढ झाल्याचे चित्र या प्रसंगी दिसून आले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





