पाचोरा आरोग्यसेवेत नवे युग : अत्याधुनिक ‘डॉ. तावरे सोनोग्राफी व डायग्नोस्टिक सेंटर’चे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन

0

Loading

पाचोरा : ग्रामीण व उपनगरातील आरोग्यसेवेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, अचूक निदान (Accurate Diagnosis) आणि गुणवत्तापूर्ण उपचार (Quality Care) या दुहेरी ध्येयाने ‘डॉ. तावरे सोनोग्राफी व डायग्नोस्टिक सेंटर’ तसेच ‘डॉ. तावरे डेंटल क्लिनिक’ पाचोर्‍यात सुरु होत असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अत्याधुनिक वैद्यकीय प्रकल्पाचे भव्य उद्घाटन होत आहे. चैत्र वैद्य शके १९४८, गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून निर्मल बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, देशमुखवाडी (तावरे हायस्कूल जवळ, पाचोरा) येथे हा सोहळा पार पडणार आहे. आजच्या वैद्यकीय क्षेत्रात ‘Early Detection is the Key to Effective Treatment’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून, अत्याधुनिक निदान तंत्रज्ञान (Advanced Diagnostic Technology) उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. याच गरजेला प्रतिसाद देत डॉ. रोहित प्रतापराव तावरे (MBBS, D.M.R.E., Consulting Radiologist) यांच्या संकल्पनेतून या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. त्यांच्या वैद्यकीय अनुभव, क्लिनिकल अचूकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम यामुळे पाचोरा परिसरातील रुग्णांना उच्च दर्जाची सेवा स्थानिक स्तरावरच मिळणार आहे. या केंद्रात Philips Affiniti 70 Elevate 12.0 या अत्याधुनिक Ultrasound प्रणालीद्वारे सेवा दिली जाणार असून, ही प्रणाली उच्च दर्जाची इमेजिंग गुणवत्ता (High Resolution Imaging) आणि अचूक निदान क्षमता प्रदान करणारी आहे. यामध्ये 3D/4D सोनोग्राफी, High Resolution Color Doppler, Elastography (FibroScan), तसेच Digital X-Ray Radiography आणि विविध इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स उपलब्ध असणार आहेत. विशेषतः गर्भवती महिलांसाठी NT Scan (11 ते 14 आठवडे), Level II Anomaly Scan (18 ते 22 आठवडे) यांसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या अत्यंत अचूकतेने केल्या जाणार आहेत. याशिवाय TRUS/TVS Sonography, Ovulation Monitoring, Breast, Thyroid, Eye-Orbit Ultrasound, Carotid व Peripheral Vascular Doppler, Endometrial Doppler, Neonatal Neurosonography तसेच Musculoskeletal Sonography या विविध तपासण्या या केंद्रात उपलब्ध राहणार आहेत. US Guided FNAC सारख्या प्रगत तपासण्या देखील येथे केल्या जाणार असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रारंभिक निदान सुलभ होणार आहे. या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘डॉ. अनुराधा रोहित तावरे डेंटल क्लिनिक’ असून, डॉ. अनुराधा रोहित तावरे (BDS, Dental Surgeon, Pune) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दंतरोग उपचारांची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. Root Canal Treatment, Ultrasonic Scaling, Dental Implants, Wisdom Tooth Surgery, Gum Surgery, Composite Filling, Digital Dental X-Ray तसेच लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार (Pediatric Dentistry) यांचा समावेश या सेवांमध्ये आहे. मुख कर्करोगाचे निदान (Oral Cancer Screening) आणि जबड्यावरील (Maxillofacial) उपचारांची सुविधा देखील येथे उपलब्ध असणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला पाचोरा तालुक्यातील प्रशासकीय, राजकीय, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन आप्पासाहेब किशोर पाटील, लोकप्रिय आमदार पाचोरा-भडगांव यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रा. प्रतापराव तावरे (अध्यक्ष, जनसेवा फाऊंडेशन, पाचोरा) आणि वासुदेव गुंडोपंत शिंदे (अधिकारी, डी.सी.सी. बँक, धाराशिव) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुनिताताई किशोर पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्ष, न.पा. पाचोरा), वैशालीताई नरेंद्र सुर्यवंशी (संचालिका, निर्मल सिड्स, पाचोरा), डॉ. धनंजय घोंगडे (Radiologist, कोल्हापूर) आणि डॉ. निखिल चौधरी (Radiologist, जळगांव) उपस्थित राहणार आहेत. तसेच भूषण अहिरे (उपविभागीय अधिकारी), विजय बनसोडे (तहसिलदार), राहुलकुमार पवार (पोलीस निरीक्षक), दादासो. मंगेश देवरे (मुख्याधिकारी), किशोर बारवकर (उपनगराध्यक्ष), सुमित किशोर आप्पा पाटील (गटनेता व नगरसेवक), संजय नाथाभाऊ गोहिल (नगराध्यक्ष), गणेश भिमराव पाटील (सभापती), प्रांजल सुमित सावंत (नगरसेविका), रहेमान बिसमिल्ला तडवी (नगरसेवक) यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वरिष्ठ डॉक्टर, हॉस्पिटल संचालक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून, पाचोरा-भडगांव डॉक्टर असोसिएशन, रोटरी क्लब, पॅथॉलॉजी लॅब, केमिस्ट व पॅरामेडिकल असोसिएशन यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक निदान सुविधा मिळविण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासत होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरच ‘Comprehensive Diagnostic & Dental Care Under One Roof’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. यामुळे वेळेची बचत, खर्चात बचत आणि अचूक निदान यांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. या उपक्रमामागे डॉ. रोहित तावरे, डॉ. अनुराधा तावरे, डॉ. अनुजा प्रविण देशमुख (तावरे) तसेच तावरे कुटुंबीयांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पाचोरा परिसरासाठी आधुनिक आरोग्यसेवेचा नवा मानदंड (New Benchmark in Healthcare) निर्माण होत आहे. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्व मान्यवर, नागरिक, पत्रकार बंधू-भगिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचोर्‍यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा आणि रुग्णकेंद्रित सेवेला नवी दिशा देणारा हा उपक्रम भविष्यात एक आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here