![]()
पाचोरा- तालुक्यात पिंपळगाव परिसरात अलीकडेच पोलीस प्रशासनातील ए पी आय कल्याणी वर्मा या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी करत सुरू करण्यात आलेल्या उपोषणामुळे वातावरण तापले असून या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. कल्याणी वर्मा मॅडम यांच्या बदलीची मागणी करणाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सर्वप्रथम उपोषणकर्त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. स्थानिक पातळीवर अनेकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, जे लोक स्वतःला पत्रकार म्हणून मिरवत आहेत, ते खरोखरच RNI नोंदणीकृत अधिकृत पत्रकार आहेत का? ज्यांच्याकडे एखाद्या वृत्तपत्राचे कार्ड आहे ते वृत्तपत्र RNI यादीवर आहे का ? त्या वृत्तपत्राने आपला प्रतिनिधी असल्याबाबत अधिकृत जिल्हा माहिती अधिकारी व शासकीय स्तरावर संबंधित व्यक्तीची नोंद केली आहे का? ते पत्रकारितेच्या कोणत्या कायद्यांत बसतात, त्यांची नोंदणी, ओळखपत्रे, तसेच अधिकृत मान्यता आहे का, याचा तपास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. कारण पत्रकार या नावाखाली अनेक वेळा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी दबाव तंत्र वापरले जाते, अशीही चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर येत आहे. उपोषणात सहभागी असलेल्या एका व्यक्तींच्या मुलाकडून रात्रीच्या वेळी वाळूचे डंपर चालवले जात असल्याचा आरोप होत असून, हा प्रकार अवैध धंद्यात मोडत नाही का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर खरोखरच असे बेकायदेशीर व्यवहार सुरू असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांवर आरोप करणे ही नैतिकतेच्या विरोधात गोष्ट ठरते, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. फक्त पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत का, तसेच पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती कारवाई झाली आहे, याचाही आता शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः आपल्याच अधिकाऱ्याच्या विरोधात चिखल फेक करणाऱ्याचा वाळू तस्करीसारख्या गंभीर मुद्द्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित असून, प्रशासनाने पारदर्शकतेने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेब यांनी स्वतः उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केल्याचे व त्यांना पोलीस संरक्षण दिल्याचे फोटो समोर आले आहे. मात्र, या कृतीवरही काहींनी टीका केली असून राहुल पवार साहेबांनी प्रथम आपल्या पोलीस स्टेशनच्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, किती केसेस नोंदवल्या जातात किती गुन्हे उघडकीस आले आहेत आणि वर्ष गुन्हे नोंदवले का जात नाही? काही दिवसापूर्वीच एकाच रात्रीत दोन मंदिरातून चांदीचे मुकुट व घंटे चोरी गेले त्याच्या तपासाची दिशा काय? पाचोरा बस स्थानक सोने चोरट्यांचा अड्डा बनला आहे असे एक ना अनेक समस्या असताना आपल्या अधिकार व कार्यक्षेत्र सोडून Pi राहुल पवार साहेबांना उपोषण समाप्त करण्यामध्ये सहभागी होण्याचे कारण काय? असे मत व्यक्त होत आहे. केवळ दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याविरोधात उपोषण करणाऱ्यांना समजावण्यापेक्षा, स्वतःच्या हद्दीत सुरू असलेल्या संभाव्य बेकायदेशीर व्यवहारांवर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे असल्याचे मत नागरिक मांडत आहेत.
जेव्हा आपल्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या व पोलीस प्रशासनाच्या विरोधात सोशल मीडियावर चिखल फेक होत आहे त्याची दखल तातडीने पाचोरा पोलीस प्रशासनाने का घेतली नाही या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला आपल्याच अधिकारी वर्गावर आरोप केले जात असताना, दुसऱ्या बाजूला आरोप करणाऱ्यांची विश्वासार्हताही तपासली जाणे आवश्यक आहे. अन्यथा, चुकीच्या माहितीच्या आधारे एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याची प्रतिमा मलीन होण्याचा धोका निर्माण होतो. सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास होणे गरजेचे आहे. उपोषणकर्ते, त्यांचे आर्थिक व्यवहार, तसेच त्यांचे सामाजिक व व्यावसायिक पार्श्वभूमी,त्यांचे दिवसभर चालणारे झांबल – चाफलचे धंदे यांचा संपूर्ण अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, पिंपळगावच नव्हे तर आधी पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांनी पाचोरा परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात उपोषणाला बसलेल्या सर्व व्यक्तींना एकाच तराजूत मोजण्याचा हेतू नसून, संबंधित गटातील केवळ एका व्यक्तीकडून सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या अपमानास्पद आणि अशोभनीय पोस्टबाबतच आक्षेप नोंदवण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीने वापरलेली भाषा ही वैयक्तिक स्तरावर बदनामीकारक आणि असभ्य स्वरूपाची आहे
एकंदरीत, कल्याणी वर्मा यांच्या बदलीच्या मागणीच्या निमित्ताने वर्मा यांच्या बाजूने महिलांनी दिलेले निवेदन काल जे ध्येय न्युज ने वृत्त प्रकाशित केले त्यामुळे उभ्या राहिलेल्या या वादामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत. केवळ आरोप-प्रत्यारोपांवर मर्यादित न राहता, संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घेणे आणि योग्य ती कारवाई करणे हीच काळाची गरज आहे. प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेतली तरच जनतेचा विश्वास टिकून राहील, अन्यथा अशा घटनांमुळे समाजात संभ्रम आणि असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.































