![]()
पाचोरा : स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी आयुष्य पणाला लावले, कारावास भोगला, ब्रिटिशांच्या दडपशाहीला न जुमानता स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली आणि पाचोऱ्याच्या मातीत ज्यांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला कृतज्ञतेची मानवंदना देण्यासाठी पाचोऱ्यात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक तसेच त्यांच्या वारसदारांचा सन्मान करण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘स्वातंत्र्य लढ्यातील समर्पित स्वातंत्र्य सैनिक कृतज्ञता सोहळा’ या नावाने होणारा हा कार्यक्रम शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे पार पडणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या उपक्रमातून केवळ स्वातंत्र्यसैनिकांचाच गौरव केला जाणार नसून, त्यांच्या त्यागाची परंपरा जपणाऱ्या वारसदारांप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. पाचोऱ्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ आंदोलने आणि कारावासापुरता मर्यादित नाही. ‘चले जाव’ आंदोलनाच्या काळात याच पाचोरा शहरातील गांधी चौकात ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे पाचोऱ्याच्या भूमीला स्वातंत्र्याच्या संघर्षातील बलिदानाची थोर परंपरा लाभली आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसदारांचा सन्मान करण्याचा उपक्रम अधिक भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करतो. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते हजारो ज्ञात-अज्ञात देशभक्तांच्या त्यागामुळे. कुणी तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठड्या सोसल्या, कुणी लाठ्या झेलल्या, कुणी कुटुंबापासून दूर राहिले, तर कुणी मातृभूमीसाठी हसत हसत मृत्यूला कवटाळले. या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल पुढील पिढीला समजावे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त व्हावी, या भावनेतून आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे सत्कार शुभहस्ते किशोर आप्पा पाटील, आमदार : पाचोरा-भडगांव मतदार संघ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रशासन, पोलीस, नगरपालिका, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून भुषण अहिरे, प्रांताधिकारी पाचोरा, गटनेते व नगरसेवक : न.पा. पाचोरा; राजेंद्र चिंचोले, करीअर मार्गदर्शक; बापु रोहम, पोलीस उपअधीक्षक, पाचोरा; विजय बनसोडे, तहसीलदार, पाचोरा; राहुल पवार, पोलीस निरीक्षक, पाचोरा; मंगेश देवरे, मुख्याधिकारी, पाचोरा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. सुनिता किशोर पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा : न.पा. पाचोरा; रावसाहेब पाटील, जिल्हाअध्यक्ष, शिवसेना; गणेश भिमराव पाटील, सभापती, कृ.उ.बा. समिती, पाचोरा-भडगांव; सुमित किशोर पाटील; किशोर बारवकर, उपनगराध्यक्ष, न.पा. पाचोरा; राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख शिवसेना; विनोद तावडे, शिवसेना तालुका प्रमुख; समाधान पाटील, शिवसेना तालुका प्रमुख, भडगांव; सुधाकर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख, भडगांव; जितेंद्र जैन, युवासेना जिल्हाप्रमुख, पाचोरा; सुमित सावंत, शिवसेना शहरप्रमुख, पाचोरा; भोला पाटील, शिवसेना शहरप्रमुख, पाचोरा; अजय चौधरी, शिवसेना शहरप्रमुख, भडगांव; नंदकिशोर देवरे, शिवसेना शहरप्रमुख, भडगांव; प्रवीण ब्राह्मणे, भिमशक्ती जिल्हाप्रमुख; संजय गोहील, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक न.पा. पाचोरा; सुनिल पाटील, शेतकरी सेवा जिल्हाप्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासोबतच त्यांच्या वारसदारांचा सन्मान करून त्यांच्या कुटुंबांनी जपलेल्या स्वातंत्र्याच्या स्मृतींनाही अभिवादन केले जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या संघर्षाचा इतिहास समाजासमोर अधोरेखित करणे आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणे, हा या सोहळ्यामागील व्यापक उद्देश आहे. आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना त्या स्वातंत्र्याची किंमत लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पाचोऱ्याच्या गांधी चौकात स्वातंत्र्यासाठी सांडलेले रक्त, तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जपलेल्या आठवणी हा या शहराचा गौरवशाली वारसा आहे. त्या वारशाला नमन करण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील आणि शिवसेनेच्या पुढाकाराने होणारा हा सोहळा पाचोऱ्याच्या राष्ट्रभक्तीच्या इतिहासातील एक अर्थपूर्ण अध्याय ठरणार आहे. कार्यक्रमाचे संपर्क व संयोजन गजु पाटील आणि रविभाऊ पाटील (माजी नगरसेवक) हे पाहणार असून, स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे वारसदार, कुटुंबीय तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कृतज्ञता सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. संपर्क : गजु पाटील – 9921211677 | रविभाऊ पाटील – 9226432730 दिनांक : शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ वेळ : सकाळी १०.३० वाजता स्थळ : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा आयोजक : शिवसेना-युवासेना, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, पाचोरा-भडगांव. “ज्यांच्या त्यागामुळे स्वातंत्र्याची पहाट उगवली, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणे ही केवळ कृतज्ञता नव्हे, तर राष्ट्रधर्म आहे!”





























