Home Blog Page 140

बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु

0

Loading

जळगाव (जिमाका वृत्त ) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. ही बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त १ रूपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली

एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आला बसावा यासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.
                  प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे. यामुळे फसवणुकीच्या प्रकरणाला

आळा बसणार आहे.
                 तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे.
              ही सर्व नोंदणी प्रकिया मोफत असून एजंट/त्रयस्थ व्यक्ती यांच्या अमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन १/- रूपया नोंदणी फी भरुन नोंदणी करावी. व एजंट/त्रयस्थ व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी एका प्रसिद्धीपत्रद्वारे केले आहे.

निरंकारी सत्संग समारोह: नए साल की शुरुआत आध्यात्मिक सुख से

0

Loading

खुशियों का संदेश लेकर नया साल आ रहा है, और इसी के साथ 1 जनवरी 2025, बुधवार को पाचोरा सेक्टर-2 अंतर्गत खडकदेवळा (ता. पाचोरा) में विशाल निरंकारी सत्संग समारोह का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम की अध्यक्षता परम आदरणीय महात्मा डी.जी. दळवी (जिला संयोजक एवं ज्ञानप्रचारक, छत्रपति संभाजीनगर) करेंगे।
        सत्संग कार्यक्रम का उद्देश्य सतगुरु के उपदेशों को जन-जन तक पहुंचाना और सेवा भावना

को जागृत करना है। यह आयोजन सत्संग, सेवा और सत्संगत के माध्यम से आध्यात्मिक उन्नति का मार्ग प्रदान करेगा। सतगुरु के वचनों से आत्मिक शांति प्राप्त करने और सकारात्मकता का अनुभव करने का यह सुनहरा अवसर सभी श्रद्धालुओं के लिए विशेष महत्व रखता है।
       कार्यक्रम 1 जनवरी 2025 को आयोजित किया जाएगा। इसका समय शाम 6 बजे से रात 9 बजे तक रहेगा। सभी सेवादल भाई-बहनों को निर्देश दिया गया है कि वे शाम 5 बजे तक कार्यक्रम स्थल पर पहुंचें और प्रारंभिक तैयारियों से लेकर समापन तक

अपनी सेवाएं प्रदान करें।
        इस वार्षिक सत्संग समारोह के आयोजन में संयोजक महेश शिवाजी वाघ (पाचोरा सेक्टर-2), प्रबंधक तुकाराम तेली (खडकदेवळा साध संगत), और सेवादल संचालक नितिन वरलानी (पाचोरा) का विशेष योगदान रहेगा। श्रद्धालुओं से अपील है कि वे अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर सतगुरु के आशीर्वाद प्राप्त करें।
           कार्यक्रम स्थल खडकदेवळा (ता. पाचोरा) पर सभी श्रद्धालुओं के लिए सुविधाओं की समुचित व्यवस्था की जाएगी। अधिक जानकारी के लिए महेश शिवाजी वाघ (मो. 9890415211), तुकाराम तेली (मो. 9834935520), या नितिन वरलानी (मो. 8446753402) से संपर्क किया जा सकता है। आइए, नए वर्ष की शुरुआत सत्संग, सेवा और आध्यात्मिक शांति के साथ करें और इस पुण्य अवसर का लाभ उठाएं।

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे “पुरुष” या नाटकाचा प्रयोग रद्द -रंगभूमीवरील दुर्मिळ घटना

0

Loading

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : जयवंत दळवी यांच्या ४० वर्ष जुन्या कलाकृतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या पुरूष या नाटकाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, प्रयोग सुरू असताना शरद पोंक्षे अचानक त्यांच्या ओळी विसरले आणि त्यांना त्यांचे संवाद आठवले नाहीत.
नाटक सुरळीत सुरू असताना एका महत्त्वाच्या प्रसंगात पोंक्षे हरवल्यासारखे दिसले आणि संभ्रमात

प्रेक्षकांकडे बघत राहिले. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली, “रसिक प्रेक्षकहो, मी पूर्ण ब्लँक झालोय, मला काहीही आठवत नाहीये, २ मिनिटं थांबू का?, अशी त्यांनी विचारणा केली.
प्रेक्षकांनी त्यांना होकार दिला आणि रंगमंचावरील दिवे बंद झाले. पोंक्षे विंगेत गेले, २ मिनिटांऐवजी ५ मिनिटं झाली, १०-१५ मिनिटं झाली. मग दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी स्टेजवर येऊन सांगितलं की, आम्ही प्रयत्न करतोय, हळूहळू थोडं-थोडं आठवतंय पण अजून थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल तेव्हा मध्यंतर आताच जाहीर करतो.
त्यानंतर ३० मिनिटांच्या मध्यांतरानंतर, दिवे परत लागले आणि पोंक्षे रंगमंचावर परत आले, फक्त

प्रयोग रद्द होत असल्याची घोषणा करण्यासाठी.
“असं ४० वर्षात पहिल्यांदाच घडत आहे. मी तुमची माफी मागतो, तुमचे पैसे परत केले जातील” असे सांगत पोंक्षे यांनी उपस्थितांची माफी मागितली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि समजूतदारपणाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
“पुरुष” या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे यांच्याही नाटकात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर शरद पोंक्षे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. पोंक्षे विस्मरणावर मात करून लवकरच रंगभूमीवर पुन्हा काम सुरू करतील अशी खात्री त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

उन्नती पाटील यांच्या 10 दिवसांच्या अथक मेहनतीतून साकारलेली संत गजानन महाराजांची अनोखी कलाकृती गुरूंना दिली सप्रेम भेट

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) : एका विद्यार्थ्याच्या अथक परिश्रमांनी आणि निष्ठेने साकारलेली कलाकृती ही केवळ कौशल्याचेच नव्हे तर गुरू-शिष्यांच्या परस्पर आदरभावाची देखील प्रचिती देते. पाचोरा येथील उन्नती नितीन पाटील या होतकरू विद्यार्थिनीने तब्बल 10 दिवस रात्रंदिवस मेहनत करून श्री संत गजानन महाराजांची अप्रतिम कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती उन्नतीने आपल्या कलाशिक्षकांना म्हणजेच शैलेश कुलकर्णी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट म्हणून अर्पण केली आहे.
     उन्नती ही कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी विद्यार्थिनी असून, तिने आपल्या गुरूंकडून प्रेरणा घेत स्वतःच्या कल्पकतेच्या बळावर

संत गजानन महाराजांची कलाकृती साकारली. या कलाकृतीत महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा दिव्य भाव आणि त्यांच्या शिकवणीची प्रतीती दिसून येते. उन्नतीने या कलाकृतीत बारकाईने रंगसंगती आणि डिझाईन साकारून तिच्या सृजनशीलतेची उत्तम उदाहरण दिली आहे.
     तब्बल 10 दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर ही कलाकृती साकार झाली आहे. उन्नतीने प्रत्येक रंगाचा आणि रेषेचा वापर अत्यंत काटेकोरपणे केला. तिच्या या मेहनतीने केवळ तिच्या

कौशल्यालाच वाव मिळाला नाही, तर कलाक्षेत्रातील तिच्या समर्पणाची आणि निष्ठेची झलकही सर्वांना पाहायला मिळाली.
       कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी हे पाचोरा तालुक्यातील एक प्रथितयश कलाशिक्षक असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नतीने दिलेली ही भेट त्यांच्या गुरू-शिष्य नात्याला अधोरेखित करणारी आहे. कुलकर्णी सरांनीही आपल्या विद्यार्थिनीच्या या अनोख्या भेटीचे मनापासून कौतुक

केले आहे.
      संत गजानन महाराज हे लाखो भक्तांच्या श्रद्धास्थान असून, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि शिकवणी यांवर अनेकांचे जीवन आधारित आहे. उन्नतीने महाराजांची कलाकृती साकारत त्यांच्या जीवनमूल्यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे.
       उन्नतीच्या या कलेचे पाचोरा तसेच जळगाव जिल्ह्यात विविध स्तरांवरून कौतुक होत आहे. तिच्या गुरूंनी दिलेले मार्गदर्शन आणि तिची मेहनत ही कलाक्षेत्रातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
    उन्नती पाटीलची ही कलाकृती तिच्या भावी प्रवासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. तिच्या या कलेतून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या सृजनशीलतेला नवा आयाम मिळेल, असेही मत स्थानिक कलारसिक व्यक्त करत आहेत.
     “विद्यार्थ्यांनी अशा कलात्मक पद्धतीने गुरू-शिष्य परंपरा जपली तर निश्चितच नव्या पिढीतील कलेला प्रोत्साहन मिळेल. उन्नतीने साकारलेली संत गजानन महाराजांची ही कलाकृती केवळ एक भेट नव्हे, तर तिच्या कलेतील निष्ठेचे प्रतीक आहे,” असे शैलेश कुलकर्णी यांनी सांगितले.
शिष्याच्या या अप्रतिम कलाकृतीने पाचोरा शहरात गुरू-शिष्य परंपरेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

सर रतन टाटा यांनी केले दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य – नितीन कोलगे

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निष्ठावान निरलस सेवाभावी उद्योगपती सर रतन नवल टाटा यांची स्मृती चिरंतन जागविण्यासाठी दक्षिण मुंबई कॅटरिंग संघातर्फे टाटा यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे रोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान कार्यक्रम परळच्या श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे घेण्यात आला. त्याप्रसंगी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हेमंत सामंत, वृषाली सामंत, प्रमोद सावंत, दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे, हिंदू राष्ट्र सेना मुंबईचे अध्यक्ष प्रकाश सावंत, खाकी वर्दीतले कनवाळू विकास शेळके, शिवशंकर बामले, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ रामपुरकर, विजय केदासे, विजय रायमाने, गीता दळवी, अविनाश सावंत, सुधीर हेगिष्टे तसेच राजेश मासावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    बंधुभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा ही सर्वोत्तम असते. नेमकी हीच सर्वोत्तम सेवा ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ करत असते. ‘रुग्ण सेवा’ हीच धर्मशाळेची ओळख आहे  के ई एम, वाडिया, तसेच कर्करोगासाठी नामांकित असलेले टाटा रुग्णालयच नव्हे तर त्या परिसरातील रस्त्यांवरही ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी देशभरातून आलेल्या कर्करोगाग्रस्त व्यक्‍तींची अवस्था जीवाला अस्वस्थ करून जाते. या रुग्णांना मुंबईच्या रस्त्यांवर राहून टाटा इस्पितळात उपचार करावे लागतात. राहाणे, खाणे, इस्पितळात जाणेयेणे, औषधोपचार यावर अफाट आणि क्षमतेपलीकडे खर्च होतो. खर्चाच्या डोंगरात कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अक्षरशः रस्त्यावर येतात. टाटा इस्पितळाच्या आजूबाजूला कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे काळजीने सुकलेले नातेवाईक ऊन-वारा-पावसात रस्त्यावर पथारी टाकलेले दिसतात. या सर्वांची सोय करता येणे शक्य नाहीच. पण या पार्श्‍वभूमीवर ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ काम करत आहे. असे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हेमंत सामंत म्हणाले.
    सर रतन टाटा यांनी दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य केले. त्यांच्या कार्याचा किंचितसा अंश करण्याची आम्हांला संधी लाभली हे आमचे भाग्य आहे. साधू आणि देव ओळखण्याचा एक संतविचार आपल्याकडे आहे तो म्हणजे- जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा। ते दैवत्व आणि साधूपण ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ च्या सेवाकार्यात आणि विचारांत वसले आहे, असे उद्गार दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे यांनी काढले.
   कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यानिमित्ताने सुग्रास जेवणाचा ‘स्वाद’ घेता आला. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष नितीन कोलगे, संतोष शेट्ये, राजू  शिंदे, दिपक मोरे, विलास कासार, संतोष कोटकर, विनायक मुंज यांच्यासह “दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ”च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

“तुझ्यासाठीच हा दिवस खास”

0

Loading

तुझ्यासाठीच हा दिवस खास,
गुणांनी भरलेला तुझा प्रवास.
शिक्षणात पुढे, खेळात पराक्रम,
संस्कृतीच्या क्षेत्रात तुझं योगदान अमूल्य.
तुझ्या नावाने आमचा गौरव वाढतो,
आणि कुटुंबाचा अभिमान उंचावतो.
आज तुझ्या वाढदिवशी तुला हाच आशीर्वाद
    तुझे स्वप्नांचे पंख                                                           आकाशाला भिडोत,
आनंदाचा झरा वाहो                            तुझ्या मनात अखंड.
    तुझ्यासाठीच हा दिवस खास,
तुझ्या कर्तृत्वाने उलगडला प्रवास.
तू घराचं चांदणं, तू मनाचं हसू,
तुझ्या यशामुळे उजळला आनंदाचा दिवस.
         तू सतत पुढे जात राहशील,
स्वप्नांना सत्यात उतरवशील.
तुझं नाव सगळ्या जगात गाजेल,
तुझं जीवन आनंदात न्हाहील.
     शिक्षणात चमकली, खेळातही सरस,
संस्कृतीच्या रंगांत भरवलास विश्वास.
तुझ्या जिद्दीचा मंत्र, चिकाटीचा आधार,
तुझं नाव उजळत राहील दरबार
        कधी न थांबशील, कधी न हार मानशील,
तुझ्या ध्येयाने जगाला मार्ग दाखवशील.
कुटुंबाचा अभिमान, तुझं यशाचं गान,
     तुझ्या पावलांनी फुलणार    
नव्या स्वप्नांचं रान.
तू सतत पुढे जात राहशील,
स्वप्नांना सत्यात उतरवशील.
         बेटा डॉ कादंबरी,
तुझ्या गुणवत्तेला सलाम, तुझ्या किर्तीला वंदन.
आमच्याकडून तुला वाढदिवसाचे लाख लाख अभिनंदन!

खडक देवळा खुर्द येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील खडक देवळा खुर्द, जि. जळगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याला गावातील सर्व नागरिक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद, तसेच विविध पदाधिकारी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये व्यापाराची आवड निर्माण करणे, पैशांचे व्यवस्थापन आणि देवाण-घेवाणीचे महत्त्व समजावणे हे होते.
मेळाव्याच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला आणि व्यापारविषयक स्टॉल्स सादर करून आपल्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची छाप पाडली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे उत्पादन विक्रीसाठी सादर करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्यात व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व शिक्षक, तसेच गावातील मान्यवरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः शाळेच्या मॅडम यांनी अथक मेहनतीने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. त्यांच्या परिश्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला.
यावेळी सरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि यापुढे अशा शैक्षणिक व व्यावसायिक उपक्रमांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
गावातील महिलांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या मेळाव्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकात्मतेचा भाव निर्माण झाला आणि बालचमूंमध्ये नवीन आत्मविश्वास जागृत झाला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षण हा केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता, तो व्यावसायिक, सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या सबळ बनवण्याचा माध्यम ठरतो, असा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
खडक देवळा खुर्दच्या शाळेने आयोजित केलेला हा बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश टाकणारा ठरला आणि गावकऱ्यांसाठीही एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

 

प्रशिक्षणार्थींची मागणी: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कालावधी वाढवून सेवा संधी मिळावी

0

Loading

भडगाव – मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या व सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी कालावधी वाढवून शैक्षणिक पात्रतेनुसार सेवा संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात भडगाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, तसेच पाचोरा प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा अनुभव देऊन त्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. प्रशिक्षण पूर्ण करून देखील अनेक प्रशिक्षणार्थींनी आपली कामगिरी उल्लेखनीय ठेवली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना अधिक कालावधीसाठी संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
योजनेचा हेतू आणि प्रशिक्षणार्थ्यांची मागणी
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही युवकांच्या कौशल्यवृद्धी आणि रोजगारासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरली आहे. प्रशिक्षणार्थींच्या म्हणण्यानुसार, या योजनेंतर्गत मिळालेल्या कामाच्या अनुभवातून त्यांनी शासकीय यंत्रणेत चांगले योगदान दिले आहे. त्यामुळे प्रशिक्षण कालावधी वाढवून त्यांच्या भविष्यासाठी एक सकारात्मक दिशा मिळावी, असे प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे केवळ त्यांचा आर्थिक विकासच होणार नाही, तर शासकीय कामकाजातही तज्ज्ञतेचा लाभ होईल.
भडगाव तहसीलदार व पाचोरा प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अनेक प्रशिक्षणार्थ्यांच्या सह्या आहेत. यामध्ये चेतन महाजन, कल्पेश अहिरे, संदीप पाटील, चेतन पाटील, सुभाष पाटील, विजयानंद पाटील, तुषार पाटील, जयेश महाजन, नितीन पाटील, नेहा तिवारी, हर्षा राजपूत, आकांक्षा सोनवणे यांचा समावेश आहे.
राज्यभरातील प्रशिक्षणार्थींनी योजनेचा उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सरकारने दखल घ्यावी व कालावधी वाढवून शासकीय सेवेत सामील होण्याची संधी द्यावी, अशी या प्रशिक्षणार्थ्यांची अपेक्षा आहे. योजनेच्या माध्यमातून युवकांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या रोजगारक्षमता वाढवणे हाही उद्देश साध्य होईल.
सध्या, सरकारकडून यावर सकारात्मक निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे. जर हा निर्णय झाला, तर राज्यातील युवकांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व त्यांच्या भविष्याला स्थिरता मिळेल.

 

पिंपळगाव हरेश्वर येथे हस्ताक्षर आणि सुलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर आणि सुलेखन यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दि. 26 व 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेला हस्ताक्षर मार्गदर्शिका सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
    या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठीच्या महत्त्वाच्या तंत्रांची ओळख करून देण्यात आली. सुंदर हस्ताक्षर कसे असावे? पेन कसा धरावा? कोणता पेन वापरावा? कोणत्या प्रकारच्या वहीत सराव करावा? या प्रश्नांची सखोल उत्तरे सौ. सुवर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसचे, हस्ताक्षर सुधारण्यासाठी सरावाचे योग्य प्रकार कोणते आहेत, सराव करताना कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे याविषयी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
    याशिवाय, सुलेखन म्हणजे काय? सुलेखनासाठी कोणकोणत्या साधनांची गरज असते? सुलेखनासाठी कोणते पेन किंवा रंग वापरले जातात? याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विविध प्रकारची सुलेखन नमुने विद्यार्थ्यांसमोर सादर केली, ज्यात वारली आर्टची उदाहरणेही समाविष्ट होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हे सर्व अनुभवले व शिकले.
    कार्यशाळेच्या वेळी विद्यार्थ्यांनी सौ. सुवर्णा पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्या शंकांचे समाधान केले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. तेली सर आणि उपप्राचार्य श्री. पी. ओ. चौधरी सर यांनी पुढाकार घेतला होता. या उपक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी सहकार्य केले.
    विद्यार्थ्यांना त्यांच्या लिखाण कौशल्याचा दर्जा सुधारण्यासाठी व लेखनकलेत रुची निर्माण होण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यशाळेतील माहिती व प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेला चालना मिळेल व त्यांच्या बौद्धिक आणि कलात्मक क्षमतेत भर पडेल, असे शिक्षकांनी सांगितले.
    ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील या यशस्वी उपक्रमाबद्दल सौ. सुवर्णा पाटील आणि सर्व शिक्षकवृंदांचे पालक व विद्यार्थ्यांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची – डॉ. मानसी पाटील

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची, उपासना शब्दांची, अनुभूती समाधानाची” अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. मानसी पाटील यांनी व्यक्त केल्या. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात दिवाळी निमित्त उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.

“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मानसी पाटील विराजमान होत्या. त्यांचे ज्येष्ठ कवयित्री जयश्री चुरी यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.

कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये नंदा कोकाटे, रविंद्र शंकर पाटील, जयश्री हेमचंद्र चुरी, वैभवी विनीत गावडे, कल्पना दिलीप मापूसकर, संजीव उंडाळकर, अनील खेडेकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, गौरी यशवंत पंडित, संतोष धर्मराज मोहिते, राजेश साबळे ओतूरकर, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, ॲड. सुजाता त्रिंबककर टिपणीस, प्रफुल अनंत साने, आश्विनी सोपान म्हात्रे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, विक्रांत मारूती लाळे आणि डॉ. प्रविण विठ्ठल शिर्के यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मध्यंतरामध्ये सानिका कुपटे यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत संमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी आणलेल्या बर्फीचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.

संमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी सादर केलेल्या गजलेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.

कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या कवयित्री गीताश्री नाईक यांना मनोगतासोबतच कविता सादर करण्याची संधीदेखील देण्यात आली. आस्वादक ममता चंद्रकांत तांबिरे, आर्या कुपटे आणि सुनिल भिकाजी मानकर ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. कवितांचा आस्वाद घेण्यासाठी सुनिल कुळकर्णी, डॉ. रुपाली प्रविण शिर्के, उमाली प्रविण शिर्के, कार्तिकेय प्रविण शिर्केआवर्जून उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील आणि विक्रांत लाळे यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

११वे मासिक कविसंमेलन शनिवार १९ जानेवारी २०२५ (अंदाजित) होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा कवी विक्रांत मारुती लाळे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!